मराठी बातम्या /बातम्या /देश /

CBI च्या छापेमारीनंतर प. बंगालहून मोठी बातमी, ममता बॅनर्जींचा भाचाच आरोपीचा संपर्कात

CBI च्या छापेमारीनंतर प. बंगालहून मोठी बातमी, ममता बॅनर्जींचा भाचाच आरोपीचा संपर्कात

Kolkata: West Bengal Chief Minister Mamata Banerjee interacts with media after meeting with government officials to take steps to combat coronavirus at State Secretariat in Kolkata, Monday, March 16, 2020. (PTI Photo)(PTI16-03-2020_000185B)

Kolkata: West Bengal Chief Minister Mamata Banerjee interacts with media after meeting with government officials to take steps to combat coronavirus at State Secretariat in Kolkata, Monday, March 16, 2020. (PTI Photo)(PTI16-03-2020_000185B)

कोलकाता इथे CBI ने छापेमारी केली असून त्यामध्ये मुख्यमंत्री ममत बॅनर्जी यांचा भाचा आरोपीच्या अगदी जवळून संपर्कात असल्याची माहिती मिळाली आहे.

  • Published by:  Kranti Kanetkar
कोलकाता, 31 डिसेंबर : पश्चिम बंगालमध्ये सध्या निवडणुकीचे वारे वेगानं वाहात आहेत. प्रचाराची रणधुमाळी रंगात आली असताना आता मुख्यमंत्री ममत बॅनर्जी यांच्या अडचणीत मोठी वाढ होत असल्याची बातमी समोर येत आहे. कोलकाता इथे CBI ने छापेमारी केली असून त्यामध्ये मुख्यमंत्री ममत बॅनर्जी यांचा भाचा आरोपीच्या अगदी जवळून संपर्कात असल्याची माहिती मिळाली आहे. पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या निवडणुका होण्यापूर्वी राज्यात खळबळ उडाली आहे. कोलकातामध्ये CBIने गुरुवारी युथ काँग्रेसचे सरचिटणीस विनय मिश्रा यांच्या घर आणि कार्यालयावर छापा टाकला. गोवंश तस्करी प्रकरणी हा छापा टाकल्याची माहिती मिळाली आहे. CBIच्या छापेमारीदरम्यान धक्कादायक माहिती समोर आल्यानं पश्चिम बंगालमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विनय मिश्रा यांना सीबीआयच्या वतीने सतत नोटीस देण्यात आली होती परंतु त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर CBI ने गुरुवारी कारवाई करत त्यांच्या कार्यालय आणि घरावर छापेमारी केली आहे. विनय मिश्रा हे ममता बॅनर्जी यांचा भाचा आणि तृणमूल काँग्रेसचे नेते अभिषेक बॅनर्जी यांचे निकटवर्तीय असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे गोवंश तस्करीत आरोपी असलेल्या विनय मिश्रांसोबत अभिषेक यांचे संपर्क असल्याची चर्चा आहे त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. तर दुसरीकडे या प्रकरणामुळे पश्चिम बंगालमध्ये येऊ घातलेल्या निवडणुकीआधीच ममत बॅनर्जी यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. हे वाचा-चीनची मुजोरी! शेतकरी आंदोलनाआडून भारतातील चिनी एजंट्स लढतायंत अप्रत्यक्ष युद्ध पश्चिम बंगालमध्ये कधी आहेत निवडणुका? पश्चिम बंगालमध्ये एप्रिल-मे 2021 दरम्यान विधानसभा निवडणुका होणार आहेत. निवडणूक आयोगानं या संदर्भात अद्याप तारखा जाहीर केल्या नाहीत. मात्र तिथे प्रचाराचा जोर आणि रणधुमाळी रंगात आली आहे. लोकसभा निवडणुकीला भाजपने तृणमूल काँग्रेसला टफ फाइट दिल्यानंतर विधानसभा निवडणुकीसाठी देखील कंबर कसली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवस पश्चिम बंगाल दौऱ्यावर स्वत: प्रचारासाठी देखील गेले होते. पश्चिम बंगालमध्ये विधानसभेसाठी एकूण 294 जागा आहेत आणि बहुमताचा आकडा गाठण्यासाठी 148 जागा जिंकण आवश्यक आहे. त्यामुळे या प्रकरणानंतर आता पश्चिम बंगालमध्ये खळबळ उडाली आहे. ममता बॅनर्जींच्या अडचणीत वाढ झाली आहे. याचा फायदा भाजप उचलणार का? भाजप कशा पद्धतीनं पुढची दिशा ठरवणार हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
First published:

Tags: BJP, CBI, Mamata banerjee, West bengal

पुढील बातम्या