मराठी बातम्या /बातम्या /देश /

West Bengal Election Results 2021 : नंदीग्राममधून ममतादीदी पिछाडीवर,सुवेंद्र अधिकारी आघाडीवर

West Bengal Election Results 2021 : नंदीग्राममधून ममतादीदी पिछाडीवर,सुवेंद्र अधिकारी आघाडीवर

ममता बॅनर्जी या नंदीग्राम मतदारसंघातून निवडणूक लढत आहे. पहिल्या फेरीचे मतदान पूर्ण झाले आहे.

ममता बॅनर्जी या नंदीग्राम मतदारसंघातून निवडणूक लढत आहे. पहिल्या फेरीचे मतदान पूर्ण झाले आहे.

ममता बॅनर्जी या नंदीग्राम मतदारसंघातून निवडणूक लढत आहे. पहिल्या फेरीचे मतदान पूर्ण झाले आहे.

  • Published by:  sachin Salve
पश्चिम बंगाल, 02 मे :  पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या  (West Bengal Election Results 2021) मतमोजणीला सुरुवात झाली आहे. निकालाचे पहिले कल हाती येण्यास सुरुवात झाली आहे. तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांना धक्का देणारे वृत्त हाती आले आहे. ममता बॅनर्जी (mamata banerjee ) नंदीग्राम मतदारसंघातून पिछाडीवर आहे. भाजपचे नेते सुवेंद्र अधिकारी (Suvendu Adhikari) आघाडीवर आहे. पश्चिम बंगालमध्ये सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात झाली आहे. ममता बॅनर्जी या नंदीग्राम मतदारसंघातून निवडणूक लढत आहे. पहिल्या फेरीचे मतदान पूर्ण झाले आहे. पहिल्या फेरीत भाजपचे उमेदवार सुवेंद्र अधिकारी आघाडीवर आहे. पहिल्या फेरीत सुवेंद्र अधिकारी यांना 7287 मतं मिळाली आहे. तर ममता बॅनर्जी यांना 5790 मतं मिळली आहे. ममतादीदी पिछाडीवर असल्यामुळे तृणमूल काँग्रेसच्या गोटात चिंता वाढली आहे. आसाममध्ये काँग्रेस परतणार की कमळ पुन्हा फुलणार? भाजप आघाडीवर तर दुसरीकडे टपाली मतदानांची मोजणी  पार पडली आहे. आतापर्यंत हाती आलेल्या मतमोजणीनुसार, तृणमूलने आघाडी घेतली आहे. तृणमूलने 100 जागांकडे कूच केली आहे. तर भाजपनेही मुसंडी मारली असून 82 जागांवर आघाडीवर आहे. त्या घटनेमुळं Rock करणार होता आत्महत्या; WWEमुळं वाचले अभिनेत्याचे प्राण पश्चिम बंगालमध्ये तृणमुलच्या एकछत्री कारभाराला सुरुंग लावण्यासाठी भाजपने तिथे जोरदार प्रयत्न केला आहे. तृणमूलचे अनेक नेते भाजपमध्ये आले. भाजपने ममता बॅनर्जी यांच्यावर तुष्टिकरणाचा आरोप करत ध्रुविकरणाचं राजकारण करत असल्याची टीका केला होती. त्यामुळे वातावरण चांगलच तापलं आहे. विशेष म्हणजे, पश्चिम बंगाल विधानसभेचा कार्यकाळ 30 मे 2021 रोजी पूर्ण होत आहे. अशात 30 मेपासून प्रामुख्याने विधानसभा आणि नवीन सरकार गठीत करण्याची प्रक्रिया सूरू होईल. पश्चिम बंगालमध्ये एकूण 294 विधानसभेच्या जागा आहेत. गेल्या 10 वर्षांपासून ममता बॅनर्जी येथे मुख्यमंत्रिपद सांभाळत आहेत. दरम्यान, ममतादीदींच्या तृणमृलला एग्झिट पोलमध्ये सर्वाधिक जागा मिळाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या एग्जिट पोलमध्ये ममता दीदींच्या तृणमूलला 152 ते 164 जागा मिळाल्या आहेत. तर भाजपला केवळ 109-121 जागा मिळाल्या आहेत. कोणत्याही पक्षाला विजयासाठी कमीत कमी 148 जागांची गरज आहे. त्यामुळे एग्झिट पोलच्या निकालानुसार पश्चिम बंगालमध्ये पुन्हा एकदा ममता दीदी विजयी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
First published:

पुढील बातम्या