मराठी बातम्या /बातम्या /देश /

West Bengal Election Results 2021 : पश्चिम बंगालमध्ये मतमोजणीला सुरुवात

West Bengal Election Results 2021 : पश्चिम बंगालमध्ये मतमोजणीला सुरुवात

पश्चिम बंगालमध्ये तृणमुलच्या एकछत्री कारभाराला सुरुंग लावण्यासाठी भाजपने तिथे जोरदार प्रयत्न केला आहे.

पश्चिम बंगालमध्ये तृणमुलच्या एकछत्री कारभाराला सुरुंग लावण्यासाठी भाजपने तिथे जोरदार प्रयत्न केला आहे.

पश्चिम बंगालमध्ये तृणमुलच्या एकछत्री कारभाराला सुरुंग लावण्यासाठी भाजपने तिथे जोरदार प्रयत्न केला आहे.

    पश्चिम बंगाल, 02 मे :  पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या  (West Bengal Election Results 2021 ) मजमोजणीला सुरुवात झाली आहे. निकालाचे पहिले कल हाती येण्यास सुरुवात झाली आहे. थोड्याच वेळात पहिला कल हाती येणार आहे. पश्चिम बंगालमध्ये कडेकोट बंदोबस्तात सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात झाली आहे. टपाली मतदानांची मोजणी सुरू झाली आहे. पश्चिम बंगाल विधानसभेचा कार्यकाळ 30 मे 2021 रोजी पूर्ण होत आहे. अशात 30 मेपासून प्रामुख्याने विधानसभा आणि नवीन सरकार गठीत करण्याची प्रक्रिया सूरू होईल. पश्चिम बंगालमध्ये एकूण 294 विधानसभेच्या जागा आहेत. गेल्या 10 वर्षांपासून ममता बॅनर्जी येथे मुख्यमंत्रिपद सांभाळत आहेत. Exit Poll मध्ये काय सांगताय आकडे? ममता दीदींच्या तृणमृलला एग्झिट पोलमध्ये सर्वाधिक जागा मिळाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या एग्जिट पोलमध्ये ममता दीदींच्या तृणमूलला 152 ते 164 जागा मिळाल्या आहेत. तर भाजपला केवळ 109-121 जागा मिळाल्या आहेत. कोणत्याही पक्षाला विजयासाठी कमीत कमी 148 जागांची गरज आहे. त्यामुळे एग्झिट पोलच्या निकालानुसार पश्चिम बंगालमध्ये पुन्हा एकदा ममता दीदी विजयी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पश्चिम बंगालमध्ये तृणमुलच्या एकछत्री कारभाराला सुरुंग लावण्यासाठी भाजपने तिथे जोरदार प्रयत्न केला आहे. तृणमूलचे अनेक नेते भाजपमध्ये आले. भाजपने ममता बॅनर्जी यांच्यावर तुष्टिकरणाचा आरोप करत ध्रुविकरणाचं राजकारण करत असल्याची टीका केला होती. त्यामुळे वातावरण चांगलच तापलं आहे. उत्तर प्रदेशात 2014 सारखं यश मिळण्याची शक्यता भाजपला वाटत नाही. त्यामुळे तिथे जे नुकसान होईल ते पश्चिम बंगालमध्ये भरून काढण्याची भाजपची योजना आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: Assembly Election 2021

    पुढील बातम्या