मराठी बातम्या /बातम्या /देश /

महाराष्ट्रानंतर आणखी एका राज्यात 'महाविकासआघाडी'साठी प्रयत्न, पण...

महाराष्ट्रानंतर आणखी एका राज्यात 'महाविकासआघाडी'साठी प्रयत्न, पण...

महाराष्ट्रामध्ये महाविकासआघाडी (Mahavikas Aghadi) करत शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांनी भाजपला सत्तेपासून दूर ठेवलं. असाच काहीसा प्रयोग तृणमूल काँग्रेस (Trinmool Congess) ने करण्याचा प्रयत्न केला.

  • Published by:  Shreyas
कोलकाता, 14 जानेवारी : महाराष्ट्रामध्ये महाविकासआघाडी (Mahavikas Aghadi) करत शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांनी भाजपला सत्तेपासून दूर ठेवलं. असाच काहीसा प्रयोग तृणमूल काँग्रेस (Trinmool Congess) ने करण्याचा प्रयत्न केला. तृणमूल काँग्रेसने भाजपविरोधात डावे आणि काँग्रेसने ममता बॅनर्जी यांना साथ द्यावी, असं आवाहन केलं होतं. पण या दोन्ही पक्षांनी या आवाहनला केराची टोपली दाखवली आहे. भाजपविरुद्ध लढायचं असेल, तर आघाडी करण्यापेक्षा तृणमूल काँग्रेसला काँग्रेसमध्ये विलिन करावं, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. दुसरीकडे भाजपने तृणमूल काँग्रेसच्या या आवाहनावर निशाणा साधला आहे. तृणमूलचं हे आव्हान म्हणजे विधानसभा निवडणुकीत (West Bengal Election) ते भाजपचा मुकाबला करू शकत नाहीत, याची कबुली असल्याची टीका भाजपने केली आहे. तृणमूल काँग्रेसचे खासदार सौगत रॉय म्हणाले, 'जर डावे आणि काँग्रेस खरंच भाजपच्या विरोधात आहेत, त त्यांनी सांप्रदायिक राजकारणाविरोधात लढाई लढणाऱ्या ममता बॅनर्जींची साथ द्यावी. ममता बॅनर्जीच भाजपविरोधात धर्मनिरपेक्ष राजकारणाच्या चेहरा आहेत.' पश्चिम बंगाल काँग्रेसचे प्रमुख अधीर रंजन चौधरी यांनी भाजपला बंगालमध्ये मजबूत होण्यासाठी तृणमूल काँग्रेसच जबाबदार आहे, असा आरोप केला. 'आम्हाला तृणमूल काँग्रेससोबत आघाडी करण्यात काडीचाही रस नाही. जर ममता बॅनर्जींना भाजपविरोधात लढाई लढण्याची इच्छा असेल, तर त्यांनी काँग्रेसमध्ये यावं, कारण सांप्रदायिकतेविरोधातल्या लढाईचा हा एकमेव मंच आहे,' असं अधिर रंजन चौधरी म्हणाले. माकप नेते सुजान चक्रवर्ती यांनी मात्र तृणमूल काँग्रेसचं हे वक्तव्य म्हणजे डावे अजूनही महत्त्वपूर्ण आहेत हे दाखवून देतं, असं म्हणलंय. डावे पक्ष आणि काँग्रेस विधानसभा निवडणुकीत तृणमूल आणि भाजपचा पराभव करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस आणि डाव्यांनी एकत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. लोकसभा निवडणुकीत डाव्या पक्षांना पश्चिम बंगालमध्ये एकही जागा मिळाली नव्हती. तर काँग्रेसला 42 पैकी फक्त 2 जागा मिळाल्या होत्या. भाजपने जोरदार मुसंडी मारत 18 जागांवर आणि तृणमूल काँग्रेसने 22 जागांवर विजय मिळवला होता. 2016 सालच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि डाव्यांना एकूण 294 पैकी 76 जागा मिळाल्या होत्या, तर तृणमूलने 211 जागा जिंकल्या होत्या. ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसपासून वेगळं होत 1998 साली तृणमूल काँग्रेसची स्थापना केली होती.
First published:

पुढील बातम्या