• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • West Bengal Elections 2021 : अशोक डिंडाच्या गाडीवर दगडफेक, पाठीला दुखापत

West Bengal Elections 2021 : अशोक डिंडाच्या गाडीवर दगडफेक, पाठीला दुखापत

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या (West Bengal Elections 2021) दुसऱ्या टप्प्याचा निवडणूक प्रचार मंगळवारी थंडावला, पण प्रचाराच्या शेवटच्या दिवशी भाजप उमेदवार आणि माजी क्रिकेटपटू अशोक डिंडा (Ashok Dinda) याच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली.

 • Share this:
  कोलकाता, 30 मार्च : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या (West Bengal Elections 2021) दुसऱ्या टप्प्याचा निवडणूक प्रचार मंगळवारी थंडावला, पण प्रचाराच्या शेवटच्या दिवशी भाजप उमेदवार आणि माजी क्रिकेटपटू अशोक डिंडा (Ashok Dinda) याच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली. अशोक डिंडा पूर्व मिदनापूरमधल्या म्योना विधानसभा मतदारसंघातून डिंडा निवडणूक लढवत आहे. या हल्ल्यामध्ये त्याच्या पाठीला दुखापत झाली. अशोक डिंडाच्या गाडीला मोयना बाजार भागाजवळ टीएमसीच्या (TMC) 50 पेक्षा जास्त कार्यकर्त्यांनी घेरल्याचा आरोप भाजपने केला आहे. या हल्ल्यामध्ये डिंडाच्या गाडीच्या काचाही फुटल्या. 30 जागांवर मतदान पश्चिम बंगालमध्ये दुसऱ्या टप्प्यात 30 विधानसभा जागांवर गुरूवारी मतदान होणार आहे, यामध्ये 171 उमेदवारांचं भवितव्य ठरणार आहे. या उमेदवारांमध्ये 19 महिला उमेदवार आहेत. भाजप आणि तृणमूल काँग्रेसने दुसऱ्या टप्प्यातल्या सगळ्या जागांवर आपले उमेदवार उतरवले आहेत. पश्चिम बंगालमध्ये एकूण 8 टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. काँग्रेस, डावे आणि त्यांचे घटकपक्ष पश्चिम बंगालमध्ये युतीच्या माध्यमातून निवडणूक लढत आहेत. दुसऱ्या टप्प्यात सीपीएम 15, काँग्रेस 9, सीपीआय 2 आणि एआयएफबी आणि आरएसपी 1-1 जागेवर निवडणूक लढत आहे. तसंच 32 अपक्षांसह 44 अन्य उमेदवारही मैदानात आहेत. पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात शनिवारी 79.79 टक्के मतदान झालं. तर यावेळी नंदीग्राम (Nandigram) मतदारसंघातही मतदान होईल. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) नंदीग्राममधून निवडणूक लढवत आहेत. टीएमसीमधून भाजपमध्ये आलेल्या शुभेंद्रू अधिकारी यांचा हा गड मानला जातो. ममता बॅनर्जींचा नंदीग्राममध्ये 50 हजार मतांनी पराभव होईल, असा दावा अधिकारी यांनी केला आहे.
  Published by:Shreyas
  First published: