पश्चिम बंगालमधील डॉक्टरांच्या समर्थनार्थ मुंबई, दिल्लीतील डॉक्टरांचे आंदोलन; रूग्णांचे हाल

पश्चिम बंगालमधील डॉक्टर्सना आता देशभरातील डॉक्टरांच पाठिंबा मिळत आहे.

News18 Lokmat | Updated On: Jun 14, 2019 11:46 AM IST

पश्चिम बंगालमधील डॉक्टरांच्या समर्थनार्थ मुंबई, दिल्लीतील डॉक्टरांचे आंदोलन; रूग्णांचे हाल

मुंबई, 14 जून : पश्चिम बंगालमध्ये ज्युनिअर डॉक्टरना झालेल्या मारहाणीचे पडसाद आता मुंबई, दिल्लीमध्ये देखील दिसून येत आहेत. पश्चिम बंगालमधील डॉक्टरांच्या समर्थनार्थ आता मुंबई, पंजाब, दिल्ली, केरळ, राजस्थान, बिहार, मध्य प्रदेशमधील डॉक्टारांनी काम करायला नकार दिला आहे. त्यामुळे आता रूग्णांचे मोठ्या प्रमाणावर हाल होताना दिसत आहेत. डॉक्टरांनी काम बंद आंदोलनाचा निर्णय घेतल्यानं दिल्लीतील AIIMS सारख्या रूग्णालयांमध्ये देखील त्याचा आता परिणाम दिसून येत आहे. मुंबईतील डॉक्टरांनी देखील काम बंदचा पवित्रा घेतला असून सायलेंट प्रोटस्टचा निर्णय त्यांनी घेतला आहे. जेजे रूग्णालयातील डॉक्टरांनी देखील आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. शिवाय, नागपूरमध्ये देखील डॉक्टरांनी आंदोलन केलं.



Loading...


मुंबईकरांना मान्सूनसाठी आणखी 7 दिवस वाट पाहावी लागणार

दिल्लीतील रूग्णालयांमध्ये गर्दी

डॉक्टारांनी काम बंद आंदोलन केल्यानं रूग्णसेवेवर त्याचा परिणाम दिसून येत आहे. रूग्णालयांमध्ये गर्दी वाढत आहे. दिल्लीतील AIIMS रूग्णालयाबाहेर देखील रूग्णांच्या संख्येत वाढ होत आहे.




धक्कादायक ! मुंबईत 13 वर्षाच्या मुलीवर सामूहिक बलात्कार

ममतांच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष

दरम्यान, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या इशाऱ्याकडे डॉक्टरांनी दुर्लक्ष केलं आहे. ममता बॅनर्जी यांनी चार तासामध्ये उपोषण संपवण्याचा अल्टिमेटम दिला होता. तर, डॉक्टरांनी ममता बॅनर्जींवर धमकी दिल्याचा आरोप केला आहे.




हर्षवर्धन यांची घेणार भेट

तर, दिल्लीतील AIIMSचे डॉक्टर केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांची भेट घेणार आहेत. यावेळी डॉक्टर आता आपल्या 3 मागण्या केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडे ठेवणार आहेत.


CCTV : मोठा अनर्थ टळला! खंडाळ्यात मोटरमनमुळे वाचला शेकडो प्रवाशांच्या जीव

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 14, 2019 11:45 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...