कोलकाता, 12 सप्टेंबर : सुशांत सिंह राजपूत प्रकरणी दररोज नवीन घडामोडी समोर येत आहेत. सुशांतचा मृत्यू आणि तपास राजकीय पक्षाने उचलून धरायचा नवा प्रकार आज समोर आला. एका बाजूला रिया चक्रवर्तीच्या विरोधात सुशांतचे फॅन्स सोशल मीडियातून व्यक्त होत असतानाच काँग्रेसने थेट रियाच्या समर्थनार्थ शनिवारी मोर्चा काढला. कोलकात्यात हा रिया चक्रवर्तीला समर्थन देणारा मोर्चा काढण्यात आला.
बिहार आणि पश्चिम बंगाल या दोन्ही राज्यात विधानसभेच्या निवडणुका लवकरच होणार आहेत. त्यामुळे सुशांत सिंह राजपूत प्रकरणाला दोन्ही राज्यांतल्या राजकीय पक्षांनी आपापल्या पद्धतीने उचलून धरलेलं पाहायला मिळत आहे.
सुशांतच्या मृत्यूचा तपास CBI कडे गेल्यावर त्यातला ड्रग्सचा अँगल पुढे आला आणि सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीला NCB ने केलेली अटक हा या प्रकरणात सर्वांत मोठा धक्का देणारी गोष्ट ठरली.
West Bengal Congress goes all out in support of Rhea Chakraborty with a rally @fpjindia pic.twitter.com/uRq9hXnIps
— Prema Rajaram (@prema_rajaram) September 12, 2020
त्यानंतर काँग्रेसचे लोकसभेतले नेते अधीररंजन चौधरी यांनी काही Tweets करत रिया चक्रवर्ती बंगाली ब्राह्मण असल्याचा जाहीर उल्लेख केला. तिला मुद्दाम लक्ष्य करण्यात येत असल्याचं वक्तव्य त्यांनी केलं. बिहारच्या निवडणुकांकडे लक्ष ठेवून भाजप मुद्दाम सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचं राजकारण करत आहे. त्यामुले सुशांतला न्याय मिळाला पाहिजे हे खरं पण सुशांतला न्याय म्हणजे बिहारला न्याय असं चित्र रंगवणं चुकीचं असल्याचं Tweet अधीररंजन यांनी केलं.
Rhea's father is a former military officer, served the nation. Rhea is a Bengalee Brahmin lady, justice to actor sushant rajput should not be interpreted as a justice to Bihari.#SushantSinghRajputCase
(4/n)
— Adhir Chowdhury (@adhirrcinc) September 9, 2020
रियाचे वडील भारतीय लष्करात होते आणि रिया चक्रवर्ती बंगाली ब्राह्मण असल्याचा उल्लेखही चौधरी यांनी सोशल मीडियावर केला होता. या सगळ्या पार्श्वभूमीवर कोलकात्यात काँग्रेस रियाच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरली. रियाविरुद्ध मीडिया ट्रायल थांबवा. सुशांत सिंह राजपूत प्रकरणात राजकारण नको, असं म्हणत रियाला समर्थन देणारे बॅनर्स काँग्रेसच्या मोर्चात मिरवले गेले.
'सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूचा तपास ड्रग्सची केस म्हणून का पुढे नेण्यात येत आहे? रियामुळे सुशांतने आत्महत्या केली, हा खुनाचा प्रकार आहे, असे आरोप प्रथम झाले. आता तिच्याविरोधात ड्रग्ज घेते म्हणून केस झाली आहे. मुंबईत अनेक कलाकार ड्रग्ज घेतात, याची NCB ला कल्पना नाही का? नार्कोटिक्स विभाग या सगळ्यांना जेलमध्ये टाकणार का', असे अनेक प्रश्न NCB तपासाबद्दल अधीररंजन चौधरी यांनी उपस्थित केले होते.
काँग्रेसच्या शनिवारच्या मोर्चात 'बंगालच्या लेकी'ला लक्ष्य करणं थांबवा, अशी मागणी करण्यात आली.