CM Mamata Banerjee यांच्या घरात दुख:द घटना, कोरोनामुळे लहान भावाचे निधन

CM Mamata Banerjee यांच्या घरात दुख:द घटना, कोरोनामुळे लहान भावाचे निधन

Mamata banerjee younger brother died कोरोनामुळे त्यांच्या शरिरातील ऑक्सिजनची पातळी प्रचंड खालावली होती असं डॉ. आलोक रॉय यांनी सांगितलं. कालिघट याठिकाणी असीम राहत होते.

  • Share this:

कोलकाता, 15 मे : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (West Bengal CM Mamata Banerjee) यांचा लहान भाऊ असीम बंदोपाध्याय (Younger Brother Asim Bandopadhyay) यांचं शनिवारी सकाळी कोरोनामुळे (Coronavirus) निधन झालं. असीम बंदोपाध्याय महिनाभरापासून कोरोनाने ग्रस्त होते. मात्र उपचारादरम्यान सकाळी त्यांचा मृत्यू झाला. कोविडच्या नियमांनुसार त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार असल्याचं कुटुंबीयांनी सांगितलं आहे. कोलकात्यातील (Kolkata) एका सुपर स्पेशालिटी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. तरीही त्यांना वाचवण्यात यश आलं नाही.

(वाचा-ब्लड कॅन्सर पीडित 3 वर्षाच्या मुलाला कोरोनाची लागण; 7 दिवसांनी घडलं अनपेक्षित)

वृत्तसंस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, असीम यांची तब्येत आज सकाळी अचानक खालावली होती. त्यांच्यावर उपचार करण्यात आले पण उपचारांना प्रतिसाद मिळाला नाही आणि अखेर सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतल्याचं मेडिको सुपरस्पेशालिटी रुग्णालयाच्या डॉक्टरांनी सांगितलं. कोरोनामुळे त्यांच्या शरिरातील ऑक्सिजनची पातळी प्रचंड खालावली होती, असं डॉ. आलोक रॉय यांनी सांगितलं. कालिघट याठिकाणी असीम राहत होते.

पश्चिम बंगालमध्ये कोरोनाची परिस्थिती प्रचंड गंभीर असल्याचं पाहायला मिळालं आहे. विधानसभा निवडणुकांच्या निकालांनंतर तर कोरोनाची आकडेवारी राज्याच प्रचंड वेगाने वाढल्याचं पाहायला मिळालं आहे. राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येचा विचार करता रोज समोर येणाऱ्या रुग्णांची आकडेवारी ही 20 हजारांवर पोहोचली आहे. तर गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोनामुळे होणाऱ्या मृतांचा रोजचा आकडा 100 च्या वर पोहोचला आहे. आतापर्यंत राज्यात सुमारे 13 हजार जणांचा मृत्यू झाला आहे.

(वाचा-लहान मुलांचं लसीकरण करण्यापेक्षा Vaccine दान करा; WHO नं का दिला असा सल्ला?)

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारसभांदरम्यान पश्चिम बंगालमध्ये प्रचंड गर्दी पाहायला मिळाली होती. अखेरच्या काही टप्प्यांमध्ये काही पक्षांनी प्रचार उरकता घेतला. पण तोपर्यंत उशीर झालेला होता. कारण निवडणुकीची धामधूम संपताच कोरोनाचा अक्राळ - विक्राळ चेहरा सर्वांच्या समोर आला. सध्या राज्यात अत्यंत भयंकर अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यात मुख्यमंत्र्यांच्या भावाचच निधन झाल्यानं कोरोनाची भीती अधिक वाढली आहे.

Published by: News18 Desk
First published: May 15, 2021, 2:19 PM IST
Tags:

ताज्या बातम्या