मराठी बातम्या /बातम्या /देश /

'मी गळा कापून घेणं पसंत करेल, पण भाजपासमोर झुकणार नाही'; ममता बॅनर्जींचा भाजपावर हल्लाबोल

'मी गळा कापून घेणं पसंत करेल, पण भाजपासमोर झुकणार नाही'; ममता बॅनर्जींचा भाजपावर हल्लाबोल

 'पण तुम्ही जर मला बंदुकीच्या नळीसमोर ठेवण्याचा प्रयत्न करत असाल, तर...'

'पण तुम्ही जर मला बंदुकीच्या नळीसमोर ठेवण्याचा प्रयत्न करत असाल, तर...'

'पण तुम्ही जर मला बंदुकीच्या नळीसमोर ठेवण्याचा प्रयत्न करत असाल, तर...'

    नवी दिल्ली, 25 जानेवारी: पश्चिम बंगालची राजधानी कलकत्ता येथे 23 जानेवारीला पार पडलेल्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीच्या कार्यक्रमात केलेल्या घोषणाबाजीवर ममता बॅनर्जी यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सोमवारी हुगळी येथील जाहीर सभेत भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. यावेळी त्यांनी म्हटलं की, 'मी भाजपासमोर झुकण्यापेक्षा गळा कापून घेणं पसंत करेल'. 23 जानेवारी रोजी व्हिक्टोरिया मेमोरियल येथे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंती निमित्त आयोजित एका सरकारी कार्यक्रमात काही लोकांनी 'जय श्री राम' च्या घोषणा दिल्या होत्या. त्यावेळी घडलेल्या प्रकाराचा निषेध करत ममता बॅनर्जी यांनी व्यासपीठावरुन भाषण देण्यास नकार दिला. याप्रकरणी ममता बॅनर्जींनी सोमवारी मोदी सरकारवर हल्ला चढवला आहे. यावेळी ममता बॅनर्जी म्हणाल्या की, 'पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर त्या लोकांनी माझा अपमान केला आहे. मी बंदुकीच्या गोळीवर विश्वास ठेवत नाही तर मी राजकारणावर विश्वास ठेवते. भाजपने नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बंगालचा अपमान केला आहे.' ममता बॅनर्जी पुढे असंही म्हणाल्या की, 'या कार्यक्रमात जर तुम्ही नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या नावानं घोषणा दिल्या असत्या तर मी तुम्हाला सलाम केला असता. पण तुम्ही जर मला बंदुकीच्या नळीसमोर ठेवण्याचा प्रयत्न करत असाल, तर अशावेळी प्रतिहल्ला कसा करायचा हे मला चांगलच ठावं आहे. त्या दिवशी त्यांनी (प्रेक्षकांनी) बंगालचा अपमान केला आहे.'
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Mamata banerjee, Narendra modi

    पुढील बातम्या