कोलकाता, 24 डिसेंबर: पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीचे (West Bengal Assembly Election) वारे आतापासूनच वाहू लागली आहेत. त्यात भाजप (BJP) कार्यकर्त्यावरील हल्ल्याच्या घटना वाढल्या आहेत. बंगालच्या पोलिसांवर भाजप कार्यकर्त्यांना बेदम मारहाण केल्याचा आरोप होत आहे. त्यात महिलांसह अनेक जण जखमी झाले आहेत.
भाजपचे ज्येष्ठ नेते कैलास विजयवर्गीय (BJP Leader kailas vijayvargiya) यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. खरदाह पोलीस स्टेशनमध्ये विरोध नोंदवण्यासाठी गेलेल्या भाजप कार्यकर्त्यावर पोलिसांनी अमानुष मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे.
हेही वाचा...मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश
पश्चिम बंगाल पोलिसांनी भाजप कार्यकर्त्यांसह महिलांवरही लाठीचार्ज केला. एक महिला राज्याची मुख्यमंत्री असताना पोलिसांकडून महिलावर होणारा असंवेदनशील आणि अमानवीय व्यवहार पाहून काय म्हणावं. 'शर्म करो ममताजी, जनता मांफ नहीं करेगी', अशा शब्दांत कैलास विजयवर्गीय यांनी ममतांना सुनावलं आहे.
खरदाह पुलिस स्टेशन विरोध दर्ज कराने गए बीजेपी कार्यकर्ताओं पर पुलिस ने लाठीचार्ज किया।
महिलाओं के खिलाफ पुलिस की कार्रवाई देखें।
एक महिला मुख्यमंत्री होते हुए राज्य में महिलाओं के साथ @WBPolice असंवेदनशील और अमानवीयता व्यवहार कर रही है!
शर्म करो ममताजी
जनता मांफ नहीं करेगी। pic.twitter.com/XCp7WbaDPx
— Kailash Vijayvargiya (@KailashOnline) December 23, 2020
दरम्यान, आरोप आहे की, नॉर्थ 24 परगना खरदा पोलीस स्टेशनमध्ये भाजप कार्यकर्त्यांवर पोलिसांनी तुफान लाठीचार्ज केला. भाजपच्या खासदारांचं म्हणणं आहे की, भाजपचे काही सदस्य आणि तीन नेत्यांना पोलिस स्टेशमध्येही बेदम मारहाण करण्यात आली.
पश्चिम बंगालमध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने जोरदार तयार केली आहे. बंगालमध्ये भाजप घराघरात पोहोचला आहे. त्यामुळेच आपच्या कार्यकर्त्यांवर हल्ले होत आहेत, असा आरोप भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली आहे.
हेही वाचा..अयोध्येत उभ्या राहणाऱ्या मशिदीचे आर्किटेक्ट आहेत हे प्राध्यापक अख्तर
गेल्या काही दिवसांपासून पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांवर हल्ले होत आहेत. भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्याही ताफ्यावर दगडफेक करण्यात आली.