कोलकाता, 11 सप्टेंबर : देशात 24 तासाला जवळपास 90 ते 95 हजाराच्या आसपास कोरोनाचे रुग्ण वाढत असताना भाजप नेत्यानं अजब दावा केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे भाजपसाठी मोठी अडचण होऊ शकते. देशात दिवसाला कोरोनाच्या रुग्णांमध्ये होणारी वाढ आणि एकूण परिस्थिती पाहता हा दावा त्यांना महागात पडण्याची शक्यता आहे.
पश्चिम बंगाल भाजप अध्यक्ष दिलीप घोष यांनी राज्यात कोरोना व्हायरस नष्ट झाल्याचा दावा केला. बुधवारी हुबळी जिल्ह्यात झालेल्या रॅलीदरम्यान त्यांनी आपल्या भाषणात हा अजब दावा केला. 'कोरोना व्हायरसचा नाशा झाला आहे. भाजप राज्यात सभा आणि रॅली आयोजित करू नये म्हणून ममता बॅनर्जी पुन्हा लॉकडाऊन करत आहेत. कोरोनाच्या नाही तर भाजपच्या भीतीनं ही स्थिती निर्माण झाल्याचा दावाही त्यांनी केला.'
Corona has gone. Didimoni (Mamata Banerjee) is acting and imposing lockdown so that BJP can't organise meetings and rallies in the state. No one can stop us: Dilip Ghosh, BJP President, West Bengal at a public rally in Dhaniakhali (9/9/2020) pic.twitter.com/VVSJ0mSBCg
पश्चिम बंगालमध्ये सध्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. भाजप विरुद्ध ममता बॅनर्जी अशी चुरशीची लढत आहे. मागच्या निवडणुकीत भाजपला निसटता पराभव स्वीकारावा लागला होता मात्र यावेळी ममता बॅनर्जींना हरवण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे.
भाजप नेते दिलीप घोष यांनी केलेल्या या अजब दाव्यामुळे पुन्हा एकदा पश्चिम बंगालमध्ये भाजपसाठी मोठी अडचण निर्माण होणार का हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.