Home /News /national /

BJP नेत्यानं मर्यादा सोडली, ममता बॅनर्जींना दिली शिवी म्हणाले...

BJP नेत्यानं मर्यादा सोडली, ममता बॅनर्जींना दिली शिवी म्हणाले...

दिलीप घोष यांनी मर्यादा सोडत अपशब्द वापरल्यानं त्यांच्यावर पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून काय कारवाई होणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.

    नवी दिल्ली, 04 डिसेंबर : महाराष्ट्रात आणि हैदराबादमध्ये मतमोजणी सुरू असून निकालाची सर्वांना प्रतीक्षा आहे तर दुसरीकडे पश्चिम बंगालमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीचे वारे वेगानं वाहू लागले आहेत. प्रचाराची रणधुमाळी शिगेला पोहोचली असतानाच भाजप अध्यक्ष आणि नेता दिलीप घोष यांनी ममता बॅनर्जींना शिवीगाळ करत अपशब्द वापरला आहे. दिलीप घोष यांनी मर्यादा सोडली असून अपशब्द वापरल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. पश्चिम बंगालमधध्ये विधानसभा निवडणुका 2021 मध्ये होऊ घातल्या आहेत. या अगोदरही निवडणुकांवरून नेत्यांमधील संघर्ष टोकाला गेल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, पश्चिम बंगाल भाजपचे प्रमुख दिलीप घोष यांनी मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांच्यावर घणाघात केला आहे. जय श्रीराम म्हणण्यात ममता बॅनर्जी यांना काय त्रास होतो? असं म्हणत भाजप नेता दिलीप घोष यांनी ममता बॅनर्जींसाठी अक्षेपार्ह शब्द वापरत शिवीगाळ केला. हे वाचा-घरात घुसून थेट हत्या करायचा, पोलिसांच्या चकमकीत खतरनाक सीरियल किलर ठार पश्चिम बंगालच्या बनगाव येथे जाहीर सभेला संबोधित करताना भाजप नेते दिलीप घोष म्हणाले की, ममता बॅनर्जी यांच्या रक्तात काय आहे? त्यांना जय श्री राम म्हणू शकत नाहीत. श्रीरामासोबत असं वर्तन का केलं जात आहे असा सवाल त्यांनी उपस्थित केला. आम्ही सत्तेत आल्यावर कार्यकर्त्यांच्या सांडलेल्या प्रत्येक रक्ताच्या थेंबाचा बदला घेऊ असा इशाराही त्यांनी दिला आहे. दिलीप घोष यांनी मर्यादा सोडत अपशब्द वापरल्यानं त्यांच्यावर पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून काय कारवाई होणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या घटनेमुऴे सध्या वातावरण गरम झालं असून आता पुढे काय कारवाई होणार हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: BJP, Mamata banerjee, West bangal

    पुढील बातम्या