नवी दिल्ली, 12 फेब्रुवारी: पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी ममता बॅनर्जींना मोठा झटका मिळाला आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते दिनेश त्रिवेदी यांनी खासदारकीचा राजीनामा दिला आहे. दिनेश त्रिवेदी यांनी राज्यसभेमध्ये त्यांच्या भाषणादरम्यान राजीनामा दिल्याने सर्वांसाठी हा मोठा धक्का होता. अशा प्रकारे पक्षाच्या ज्येष्ठ नेत्याचा राजीनामा ममता बॅनर्जींसाठी मोठा धक्का मानला जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, दिनेश त्रिवेदी येत्या एक-दोन दिवसांत भाजपमध्ये प्रवेश करू शकतात.
I am personally in agreement with this. The way forward is to let our young talented mind innovate, create and distribute wealth. Pay Govt levies, create jobs. For that, our Govt officers (babus) too, need to encourage the youth . https://t.co/iyDIP6NR4D
— Dinesh Trivedi (@DinTri) February 10, 2021
'मी आज राज्यसभेचा राजीनामा देत आहे. माझ्या राज्यात हिंसाचार होत आहे आणि आम्ही येथे काहीही बोलू शकत नाही', अशी कटू प्रतिक्रिया देत टीएमसीचे राज्यसभेचे खासदार दिनेश त्रिवेदी यांनी पक्षाला रामराम केला.
(हे वाचा-‘शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर हवं,' शेतकरी महिलेची राष्ट्रपतींकडे मागणी)
दिनेश त्रिवेदी यांनी अर्थसंकल्पीय चर्चेदरम्यान असे म्हटले की बंगालच्या विकासासाठी मी राजीनामा देत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार ते लवकरच भाजपमध्ये जाण्याची शक्यता आहेत. तृणमूल कॉंग्रेसचे आणखी काही खासदार भाजपच्या संपर्कात आहेत, असा दावा भाजप नेत्यांनी केला आहे. त्यामुळे येणाऱ्या काही दिवसांत पक्षाचे आणखी काही खासदार राजीनामा देऊ शकतात, ही शक्यता नाकारता येत नाही. बंगालमधील निवडणुका होण्यापूर्वी अनेक आमदार आणि ज्येष्ठ नेते भाजपमध्ये दाखल झाले आहेत, यामध्ये आता दिनेश त्रिवेदी यांचेही नाव जोडले जाऊ शकते.
याप्रकरणी तृणमूल कॉंग्रेसची पहिली प्रतिक्रियाही समोर आली आहे. सौगत रॉय यांनी दिनेश त्रिवेदी यांच्या या घोषणेस दु:खद म्हटले आहे. ते म्हणाले की, पार्टी फोरममध्ये त्रिवेदी यांनी याविषयी कधी कोणते भाष्य केले नव्हते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP, Congress, Mamata banerjee, Modi government, PM narendra modi, Politics, TMC