पश्चिम बंगाल विधानसभा जिंकण्यासाठी हा आहे भाजपचा ‘मास्टर प्लॅन’

पश्चिम बंगाल विधानसभा जिंकण्यासाठी हा आहे भाजपचा ‘मास्टर प्लॅन’

West Bengal Assembly Poll : 2021मध्ये होणारी विधानसभा जिंकण्यासाठी भाजपनं रणनीती आखली आहे.

  • Share this:

कोलकाता, 09 जून : पश्चिम बंगालची राजकीय लढाई आता भाजपसाठी प्रतिष्ठेची आणि महत्त्वपूर्ण झाली आहे. तृणमुल काँग्रेसच्या सर्वेसर्वा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपला ललकारलं आहे. लोकसभा निवडणुकीत 42 पैकी 18 जागा जिंकल्यानंतर आता भाजपनं 2021मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठी कंबर कसली आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपचे सध्या केवळ सहा आमदार आहेत. पण, हाच आकडा 250 करण्यावर भाजपनं लक्ष केंद्रीत केलं आहे. पश्चिम बंगालची विधानसभा सदस्य संख्या ही 294 आहे. यावर बोलताना पश्चिम बंगालचे प्रभारी कैलास विजयवर्गीय यांनी लोकसभेसाठी आम्ही 22 आकडा डोळ्यासमोर ठेवला होता. पण, आम्हाला 18 जागा जिंकता आल्या. विधानसभेसाठी आम्ही 250 हे लक्ष्य निश्चित केल्याचं कैलास विजयवर्गीय यांनी म्हटलं आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या 2 वर्षे आधीच राजकीय डावपेचांना सुरूवात झाल्याचं पाहायाला मिळत आहे.


रेव्ह पार्टीवर पोलिसांची रेड; अल्पवयीन मुलं, मुलींसह 600 ताब्यात

प. बंगालमध्ये भाजपची ताकद आहे?

2014ची तुलना करता पश्चिम बंगालमध्ये भाजपची ताकद खूपच कमी होती. पण, भाजपनं त्यावर लक्ष केंद्रीत करत 2019च्या लोकसभा निवडणुकीत 18 खासदारांना विजयी करणयाची किमया साधली. त्यासाठी पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी देखील मेहनत घेतली. 2014मध्ये 34 जागा जिंकणारी तृणमुल काँग्रेस 2019मध्ये 22 जागा जिंकू शकली. तर, भाजपनं 18 जागा जिंकल्या. सध्या पश्चिम बंगालमधील राजकीय वातावरण जबरदस्त तापलेलं आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला 40.5 टक्के मतं मिळाली आहेत.


जिनं जन्मानंतर राहुल गांधींना सर्वप्रथम हातात उचललं होतं; तिची झाली खास इच्छापूर्ती

ममतांची रणनीती

ममता बॅनर्जी यांनी देखील आता 2021च्या विधानसभा निवडणुकीसाठी रणनीती आखायला सुरूवात केली आहे. लोकसभा निवडणुकीत अपेक्षित कामगिरी करता न आल्यानं त्यांनी आता 2021 करता रणनीतीकार प्रशांत किशोर यांना विधानसभेचा मास्टर प्लॅन तयार करण्यास सांगितले आहे.


VIDEO: सिलेंडरने भरलेल्या ट्रकचा भीषण स्फोट; नॅशनल हायवे ठप्प

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 9, 2019 03:22 PM IST

ताज्या बातम्या