• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • Assembly elections 2021: बंगालचा किल्ला कोण जिंकणार? '3 मे रोजी आमचा मुख्यमंत्री बनेल’ भाजपचा दावा

Assembly elections 2021: बंगालचा किल्ला कोण जिंकणार? '3 मे रोजी आमचा मुख्यमंत्री बनेल’ भाजपचा दावा

west bengal elections

west bengal elections

west Bengal elections 2021: पश्चिम बंगाल निवडणूकीत टीएमसी (TMC) आणि भाजप(BJP) दोन्ही पक्ष चांगलाच जोर लावताना दिसुन येत आहे. तसेच मुख्यमंत्री पदावर सुद्धा दावेदारी ठोकायला सुरुवात झाली आहे.

 • Share this:
  कोलकाता, 5 मार्च: पश्चिम बंगालमध्ये (west Bengal elections 2021) निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेले आहे. एकीकडे सत्ताधारी तृणमूल काँग्रेस (Trinamool Congress) स्वतःच सरकार वाचवण्याच्या प्रयत्नात व्यस्त आहे, तर दुसरीकडे भारतीय जनता पार्टी ( BJP) राज्यात दिग्गजांच्या फौजेसह सज्ज आहे. गुरुवारी टीएमसीच्या (TMC) प्रमुख नेत्यांनी राजधानी कोलकाता (Kolkata) येथे प्रभाग अध्यक्ष व पक्षाचे संयोजक यांची भेट घेतली. यावेळी अभिषेक बॅनर्जी (Abhishek Banerjee) यांच्यासह पक्षाचे अनेक मोठे नेते उपस्थित होते. मात्र, भाजपने राज्यात मोठा विजय मिळवण्याचा दावा केला आहे. टीएमसीचा पक्ष प्रचारावर जोर : कोलकाता येथील टीएमसी भवन येथे पक्षाच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत अभिषेक बॅनर्जी, पार्थ चटर्जी यांच्यासह अनेक बड्या नेत्यांनी टीएमसीच्या प्रभाग अध्यक्षांशी चर्चा केली. एएनआयच्या म्हणण्यानुसार, आपापल्या प्रभागाला मजबूत करण हा या बैठकीचा मूळ उद्द्येश होता. या भागात अधिक झेंडे आणि होर्डिंग्ज लावण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. विशेष म्हणजे राज्यात टीएमसी, भाजप आणि कॉंग्रेस-डाव्या अस्तित्वामुळे ही निवडणूक त्रिकोणी होऊ शकते. '3 मे रोजी भाजपचा मुख्यमंत्री बनेल’ गुरुवारी भाजपचे खासदार तेजस्वी सूर्य यांनी पक्षाच्या बहुमताचा दावा केला आहे. ते म्हणाले, 'पश्चिम बंगालमध्ये भाजपा 200 पेक्षा जास्त जागा जिंकेल. मुख्यमंत्री म्हणून ममता बॅनर्जी यांचे दिवस आता संपले आहेत. 3 मे रोजी पश्चिम बंगालमध्ये भाजपचा मुख्यमंत्री होईल. यावेळी त्यांनी सध्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर सुद्धा राज्यात हिंसाचार भडकवण्याचा आरोप केला आहे. पश्चिम बंगाल आणि केरळमध्ये भाजपच्या होत असलेल्या मतविभागणीबद्दल तेजस्वी सूर्या असं म्हणाले की,’ आतापर्यंत हा डाव्यांचा वारसा होता जो ममता बॅनर्जी आतापर्यंत चालवत होत्या पण आता पण आता राज्यात राजकीय हत्या किंवा रक्तपात होणार नाही. कारण येथे भाजपचे स्वत: चे मुख्यमंत्री असतील.’ हे वाचा -   'दिदी बंगाली वाघिण...', बंगालमध्ये निवडणूक लढवण्याबाबत संजय राऊतांनी केली ही घोषणा विशेष म्हणजे आज भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठकही होणार आहे. असा अंदाज वर्तविला जात आहे की आसाम, बंगाल, तामिळनाडू, केरळ आणि पुडुचेरीमधील पक्षांची उमेदवारांची यादी आज जाहीर केली जाऊ शकते. पश्चिम बंगाल निवडणुका 8 टप्प्यात होणार आहेत. मतदानाची प्रक्रिया 27 मार्चपासून सुरू होईल, जी 8 वेगवेगळ्या टप्प्यात 29 एप्रिलपर्यंत चालेल. निवडणूक आयोगाच्या वेळापत्रकानुसार 2 मे रोजी मतमोजणी होणार आहे.
  Published by:news18 desk
  First published: