Home /News /national /

ओवैसींनी एखाद्या हिंदूसोबत फोटो काढावा, मोदींवरील टीकेला अमित शहांचं उत्तर

ओवैसींनी एखाद्या हिंदूसोबत फोटो काढावा, मोदींवरील टीकेला अमित शहांचं उत्तर

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यासोबत एका मुस्लीम तरुणाचा फोटो काही दिवसांपूर्वी व्हायरल (Viral) झाला होता. या फोटोवरुन AIMIM पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी मोदींवर टीका केली होती.

    कोलकाता, 9 एप्रिल: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यासोबत एका मुस्लीम तरुणाचा फोटो काही दिवसांपूर्वी व्हायरल (Viral) झाला होता. तो फोटो बंगालमधील एका निवडणूक प्रचार सभेतील होता. या फोटोतील मुस्लीम तरुण मोदींच्या कानात काही तरी सांगत असल्याचं दिसत होतं. या फोटोवरुन AIMIM पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi)  यांनी मोदींवर टीका केली होती. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी या टीकेला उत्तर दिलं आहे. ओवैसी यांनी एखाद्या हिंदूसोबत फोटो काढावा असं आव्हान अमित शहांनी दिलं आहे. ओवैसी यांनी गुरुवारी त्यांच्या ट्विटर हँडलवरुन एक व्हिडीओ शेअर केला होता. तो एका सभेतील व्हिडीओ असून यामध्ये ओवैसी यांनी तिहेरी तलाक, NRC यासह वेगवेगळ्या मुद्यांवर सरकारवर टीका केली आहे. "त्याचबरोबर 'त्या' मुस्लीम तरुणाने  मी बांगलादेशी नाही, असं मोदींना कानात सांगितले असेल,'' असा टोला ओवैसी यांनी लगावला होता. त्याला अमित शहांनी उत्तर दिलं आहे. अमित शहांनी कोलकातामध्ये पत्रकार परिषद घेतली.  या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamta Banerjee) यांच्यावर टीका केली आहे. ममता बॅनर्जी पराभवामुळे बिथरल्या आहेत. त्यांच्या राज्यात महिलांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न आहे. पहिल्या तीन टप्प्यात भाजपा 63 ते 68 जागा जिंकणार असल्याचा दावा देखील शहा यांनी केला (वाचा: Unnao Rape Case: बलात्कार प्रकरणातील दोषी कुलदीप सेंगरच्या पत्नीला भाजपचं तिकीट) "भाजपाच्या कार्यकर्त्यांवर गेल्या काही दिवसांमध्ये सतत हल्ले झाले. आमचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांच्यावर देखील हल्ला झाला. या विरोधात टीएमसी नेत्यांनी काहीही वक्तव्य केलं नाही. त्यांचं मौन हे हिंसाचार करण्यास पाठिंबा देत आहे,'' असा दावा देखील अमित शहा यांनी यावेळी केला. बंगालमध्ये चौथ्या टप्प्यात शनिवारी मतदान होणार आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Amit Shah, Asaduddin owaisi, Assembly Election 2021, Mamata banerjee, Pm narenda modi, Viral, West bengal

    पुढील बातम्या