मराठी बातम्या /बातम्या /देश /EXIT Polls 2021: या 2 संस्थांच्या पोल्सने बंगामध्ये दाखवला भाजपचा विजय

EXIT Polls 2021: या 2 संस्थांच्या पोल्सने बंगामध्ये दाखवला भाजपचा विजय

West Bengal Assembly Election 2021: बंगालमध्ये मोदींची जादू चालली की नाही हे खरं तर 2 तारखेच्या मतमोजणीतूनच उघड होईल. तोवर कुठल्या EXIT Polls ने कुणाला किती मतं दाखवली आहेत, ते पाहा.

West Bengal Assembly Election 2021: बंगालमध्ये मोदींची जादू चालली की नाही हे खरं तर 2 तारखेच्या मतमोजणीतूनच उघड होईल. तोवर कुठल्या EXIT Polls ने कुणाला किती मतं दाखवली आहेत, ते पाहा.

West Bengal Assembly Election 2021: बंगालमध्ये मोदींची जादू चालली की नाही हे खरं तर 2 तारखेच्या मतमोजणीतूनच उघड होईल. तोवर कुठल्या EXIT Polls ने कुणाला किती मतं दाखवली आहेत, ते पाहा.

    नवी दिल्ली, 29 एप्रिल : बहुतेक सर्व संस्थांनी मतदानोत्तर चाचणीत (Exit Polls 2021) बंगालमध्ये ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसला आघाडीवर दाखवलं आहे. मोदींची जादू बंगालमध्ये चालली नाही, असंच Exit Polls मधून दिसत आहे. अपवाद फक्त रिपब्लिक CNX आणि जन की बात या दोन सर्वेक्षणांचा. या दोन संस्थांनी भाजपला बंगालमध्ये TMC पेक्षा अधिक जागा दिल्या आहेत.

    Republic CNX Exit Poll नुसार पश्चिम बंगालमध्ये TMC ला 128 ते 132 जागा मिळतील अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे, तर भाजपला 38-148 आणि डाव्यांसह इतर पक्षांना 11-21  जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

    जन की बात या एक्झिट पोलमध्ये (Jan ki baat Exit Poll West Bengal 2021)  भाजपला 152 - 164 जागा दाखवण्यात आल्या आहेत. तृणमूलला 104 ते  121 जागा दाखवण्यात आल्या आहेत.

    Times Now आणि C-Voter ने केलेल्या Exil Poll मध्ये मात्र भाजपला 115 तर TMC ला 158 जागा दाखवण्यात आल्या आहेत. डाव्या आघाडीला 19 जागांचा अंदाज या पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे.

    ABP ने CVoter बरोबर केलेल्या सर्वेक्षणात भाजपला 109 ते 121 जागांचा अंदाज आहे, तर TMC ला दीडशेच्या पुढे जागा मिळतील, असं सांगण्यात येत आहे. काँग्रेस, डावे मिळून जास्तीत जास्त 25 जागांचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

    पश्चिम बंगालमध्ये ममता बनर्जींच्या तृणमूल काँग्रेस आणि भाजप या दोघांसाठी ही निवडणूक अग्निपरीक्षेपेक्षा कमी नव्हती. आता यामध्ये खरंच कोणाला अधिक जागा मिळणार हे 2 तारखेच्या मतमोजणीलाच उघड होईल.

    Exit Poll Live : कोण जिंकणार, कोण हरणार? या पाच राज्यात कोणाचं सरकार?

    पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदान गुरुवारी (29 एप्रिल) सायंकाळी सहा वाजता पार पडलं. पश्चिम बंगालमध्ये 294 विधानसभा निवडणुकांसाठी मतदान झालं. बंगाल विधानसभा निवडणुकीच्या आठव्या आणि शेवटच्या टप्प्यात अनेक भागात छोट्या-मोठ्या हिंसाचाराच्या घटना समोर आल्या आहे. विधानसभेच्या आठव्या आणि शेवटच्या टप्प्यात 35 जागांसाठी 11,860 मतदान केंद्रांवर मतदान पार पडलं. यामध्ये 11-11 जागा मुर्शीदाबाद आणि बीरभूम जिल्ह्यात तर सहा जागा मालदा आणि सात जागा कोलकाताच्या उत्तरेकडील आहेत. बंगालमध्ये पहिल्या टप्प्याची निवडणूक 27 मार्च रोजी सुरू झाली होती. त्याशिवाय 2 मे (रविवारी) रोजी मतमोजणी होणार आहे. पश्चिम बंगालमध्ये एकूण 294 जागांसाठी निवडणूक पार पडली. यात कोणत्याही पक्षाला विजयासाठी कमीत कमी 148 जागांची गरज आहे.

    पश्चिम बंगाल विधानसभेचा कार्यकाळ 30 मे 2021 रोजी पूर्ण होत आहे. अशात 30 मेपासून प्रामुख्याने विधानसभा आणि नवीन सरकार गठीत करण्याची प्रक्रिया सूरू होईल. पश्चिम बंगालमध्ये एकूण 294 विधानसभेच्या जागा आहेत. गेल्या 10 वर्षांपासून ममता बॅनर्जी येथे मुख्यमंत्रिपद सांभाळत आहेत.

    First published:

    Tags: Assembly Election 2021, West Bengal Election