Home /News /national /

सौरव गांगुलीच्या आधी एका क्रिकेटपटूचं राजकीय पदार्पण, ममता दीदींना देणार साथ

सौरव गांगुलीच्या आधी एका क्रिकेटपटूचं राजकीय पदार्पण, ममता दीदींना देणार साथ

टीम इंडियाचा माजी कॅप्टन आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीच्या (Sourav Ganguly) राजकीय प्रवेशाची गेल्या काही महिन्यांपासून चर्चा होती. पण, जानेवारी महिन्यात गांगुलीला हार्ट अटॅक आला आणि त्याच्या राजकीय प्रवेशाच्या चर्चा मागे पडल्या.

पुढे वाचा ...
  कोलकाता, 24 फेब्रुवारी : टीम इंडियाचा माजी कॅप्टन आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीच्या (Sourav Ganguly) राजकीय प्रवेशाची गेल्या काही महिन्यांपासून चर्चा होती. बंगालमध्ये यावर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या आधी गांगुली राजकारणाच्या मैदानात उतरणार असं मानलं जात होतं. पण, जानेवारी महिन्यात गांगुलीला हार्ट अटॅक आला आणि त्याच्या राजकीय प्रवेशाच्या चर्चा मागे पडल्या. आता सौरव गांगुलीच्या आधीच बंगालचा माजी कॅप्टन मनोज तिवारी (Manoj Tiwari) राजकीय मैदानात उतरणार आहे. टीम इंडियाचा माजी खेळाडू असलेला मनोज तिवारी बंगालच्या रणजी टीमचा कॅप्टन होता. तो अजूनही देशांतर्गत क्रिकेटमध्ये सक्रीय आहे. ‘राजकारणाच्या कठीण पिचवर मी तृणमुल काँग्रेससाठी (TMC) बॅटिंग करणार आहे,’ अशी घोषणा तिवारीनं केली आहे. ‘मला फक्त नामधारी नाही, तर काम करणारा नेता व्हायचं आहे. ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी माझ्यावर विश्वास टाकला आहे. मी दीदींना एकटं सोडू शकत नाही.’ असं तिवारीनं यावेळी स्पष्ट केलं. मोदी सरकारवर टीका मनोज तिवारीनं एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये आपल्या राजकीय प्रवेशाची भूमिका सविस्तर मांडली आहे. ‘ मी बराच होमवर्क करुन राजकारणात उतरलो आहे. क्रिकेट खेळून मी बरंच काही मिळवलं. आता लोकांसाठी काम करण्याची वेळ आहे. मी गरिबी पाहिली असून गरिबांचं दु:ख काय असंत हे मला माहिती आहे.’

  (वाचा - जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियमला आता नरेंद्र मोदींचं नाव!)

  पेट्रोल आता 100 रुपये लीटरपर्यंत पोहचलं आहे. गरीब आणि शेतकऱ्यांची अवस्था वाईट आहे. मी गरिबांचं कष्ट कमी करण्यासाठी काम करणार आहे. ममता बॅनर्जी यांच्यापासून प्रेरणा घेऊन मी आता सक्रीय राजकारणी होण्यासाठी राजकीय मैदानात उतरलो आहे,’ असं तिवारीनं स्पष्ट केलं. 2008 साली केलं होतं पदार्पण मनोज तिवारीनं 2008 साली टीम इंडियात पदार्पण केलं होतं. तो 2015 साली शेवटची आंतरराष्ट्रीय मॅच खेळला. या काळात त्यानं 12 वन-डे आणि 3 T20 मॅच खेळल्या. 35 वर्षांच्या  तिवारीनं वन-डे मध्ये 287 तर आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये 15 रन केले. आयपीएलमध्ये देखील तो सक्रीय होता.

  ( वाचा : Drugs Case : पोलिसांची मोठी कारवाई, भाजप नेत्याला दोन मुलांसह अटक )

  पी.टी. उषाही राजकीय धावपट्टीवर? बंगालप्रमाणेच केरळ विधानसभेच्या देखील यावर्षी निवडणुका आहेत. या निवडणुकीच्या पूर्वी मेट्रो मॅन (Metro man) ई. श्रीधरन (E. Sreedharan)  यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. आता त्यापाठोपाठ भारताची महान धावपटू पी.टी. उषा (PT Usha) देखील भाजपामध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. याबाबतची अधिकृत घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे.
  Published by:News18 Desk
  First published:

  Tags: Cricket, India, Kerala, Mamata banerjee, Sourav ganguly, Sports, West bengal

  पुढील बातम्या