कोलकाता, 06 एप्रिल: पश्चिम बंगालमध्ये आज तिसऱ्या टप्प्यासाठी (West Bengal Assembly Election 2021) मतदान होत आहे. एकूण 31 विधानसभा मतदारसंघांसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. दरम्यान त्यापूर्वी बंगालमध्ये एक खळबळजनक प्रकार घडला आहे. याठिकाणी एकी टीएमसी नेत्याच्या घरी 4 इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशिन्स अर्थात EVM आणि 4 वोटर-व्हेरिफिएबल पेपर ऑडिट ट्रेल (VVPATs) सापडल्याने खळबळ उडाली आहे. उलबेरिया विधानसभा मतदारसंघात सोमवारी रात्री ही घटना घडली.
पश्चिम बंगान विधानसभा निवडणुकीच्या (West Bengal Assembly Voting) तिसऱ्या टप्प्यादरम्यान उलुबेरियामध्ये हा धक्कादायक प्रकार घडल्याने निवडणूक आयोग (Election Commission) पुन्हा राजकीय पक्षांच्या निशाण्यावर आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उलुबेरियात तृणमूल कॉंग्रेसच्या नेत्याच्या घरातून ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीन सापडल्या आहेत. मात्र या मशिनचा मंगळवारी असणाऱ्या मतदानाशी कोणताही संबंध नसल्याचे आयोगाने म्हटले आहे. ही बाब उघडकीस आल्यानंतर भारतीय जनता पक्षाने गदारोळ करत कारवाईची मागणी केली.
त्याचबरोबर ही घटना समोर आल्यानंतर निवडणूक आयोगाने म्हटले आहे की, 'सेक्टर ऑफिसरला निलंबित करण्यात आले आहे. ते आरक्षित ईव्हीएम होते, जे निवडणूक प्रक्रियेतून काढून टाकण्यात आले आहे. सर्वांवर गंभीर कारवाई केली जाईल.
Sector Officer has been suspended. It was a reserved EVM that has been removed from the election process. Severe action will be taken against all involved: Election Commission of India (ECI)
EVMs and VVPATs were found at the residence of a TMC leader in Uluberia, West Bengal pic.twitter.com/IBFwmDSXeY — ANI (@ANI) April 6, 2021
दरम्यान भाजपचे उमेदवार चिरन बेरा यांनी असा आरोप केला आहे की, या मशीन्स टीएमसी नेते गौतम घोष यांच्या तुलसीबेरीया याठिकाणच्या घरात सापडल्या आहेत. त्यांनी असा देखील आरोप केला आहे इलेक्शन ड्यूटीच्या कारमधून या मशिन्स आणण्यात आल्या आहेत. त्यांच्या मध्ये सेक्शन 17 मध्ये इलेक्शन ड्यूटीसाठी असणारी गाडी या टीएमसी नेत्याच्या घराबाहेर उभी होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.