Home /News /national /

स्टेशनच्या इमारतीचा खांब तुटला अन् काही सेंकदात बिल्डिंगचा भाग कोसळली LIVE VIDEO

स्टेशनच्या इमारतीचा खांब तुटला अन् काही सेंकदात बिल्डिंगचा भाग कोसळली LIVE VIDEO

बर्धमान रेल्वे स्टेशन एक प्रमुख रेल्वे स्थानक आहे. स्टेशनवर जेव्हा ही घटना घडली तेव्हा येथे मोठ्या संख्येने प्रवासी उपस्थित होते

    कोलकाता, 04 जानेवारी :  कोलकाता इथं शनिवारी संध्याकाळी पश्चिम बंगालच्या बर्धमान (Bardhaman railway station) रेल्वे स्थानकात मोठा अपघात झाला आहे. स्टेशनचा एक भाग अचानक कोसळल्याने अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले असल्याचं सांगण्यात येत आहे. या दुर्घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काही प्रवाशी अद्यापही ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. घटनेनंतर स्टेशनवर एकच गोंधळ उडाला. प्राथमिक माहितीनुसार, अपघातात 5 जण जखमी झाले आहेत. त्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पूर्व रेल्वेतील बर्धमान रेल्वे स्टेशन एक प्रमुख रेल्वे स्थानक आहे. स्टेशनवर जेव्हा ही घटना घडली तेव्हा येथे मोठ्या संख्येने प्रवासी उपस्थित होते. रेल्वे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेनंतर अनेक प्रवाशी ढिगाराखाली दबल्याची भीती व्यक्त केली जात आहे. हे लक्षात घेता बचाव मोहीम सुरू केली गेली आहे, यात आपत्ती व्यवस्थापन पथक तसेच रेल्वे व स्थानिक पोलिसांचे लोकही सामील आहेत.
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: Building, West bengal

    पुढील बातम्या