मराठी बातम्या /बातम्या /देश /निवडणुकीचा संघर्ष रस्त्यांवर; भाजप केंद्रीय मंत्र्यांच्या रॅलीवर दगडफेक, पाहा LIVE VIDEO

निवडणुकीचा संघर्ष रस्त्यांवर; भाजप केंद्रीय मंत्र्यांच्या रॅलीवर दगडफेक, पाहा LIVE VIDEO

भररस्त्यात हा गोंधळ सुरू होता, याचा एक live Video समोर आला आहे

भररस्त्यात हा गोंधळ सुरू होता, याचा एक live Video समोर आला आहे

भररस्त्यात हा गोंधळ सुरू होता, याचा एक live Video समोर आला आहे

कलकत्ता, 18 जानेवारी : पश्चिम बंगालमध्ये (West Bangal) हिंसाचाराचं राजकारण संपण्याचं नाव घेत नाहीये. तृणमूल सुप्रीमो आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी ज्यावेळी शुभेंदु अधिकारींचा (Suvendu Adhikari) गड नंदीग्राममध्ये जनसभा संबोधित करीत होते, त्यावेळी भाजपने मोठे नेता कलकत्त्यात एक रॅलीमध्ये होते. या रॅलीदरम्यान भाजप कार्यकर्त्यांवर दगडफेक करण्यात आली. यानंतर रागाच्या भरात भाजप कार्यकर्त्यांनी तोडफोड केली.

ममता बँनर्जी यांची पार्टी तृणमूल कॉग्रेसचा गड दक्षिण कलकत्त्यात केंद्रीत मंत्री देबश्री चौधरी (Union Minister Debasree Chaudhuri), पश्चिम बंगाल भाजपचे प्रदेश अध्यक्ष दिलीप घोष आणि शुभेंद्रु अधिकारी यांच्या नेतृत्वात कलकत्यात एक पदयात्रा काढण्यात आली होती. पदयात्रेत सामील भाजप कार्यकर्त्यांवर दगडफेक केल्याची तक्रार भाजपकडून करण्यात आली आहे.

टोलीगंड मेट्रो स्टेशन ते रासबिहारी नाक्यापर्यंत या रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. कलकत्यात भाजप रॅलीत पहिल्यांदाच शुभेंद्र अधिकारी सामील झाले. रॅलीनंतर रास बिहारी रस्त्यावर एक जनसभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यादरम्यान रॅलीतील भाजप कार्यकर्त्यांवर दगडफेक करण्यात आली.

First published:

Tags: BJP, Viral video., West bangal