Home /News /national /

चक्रीवादळानंतर पाहणी करण्यासाठी गेले, नाल्यातच पडले नगरपालिका आयुक्त; VIDEO मध्ये पाहा लोकांनी कसं वाचवलं

चक्रीवादळानंतर पाहणी करण्यासाठी गेले, नाल्यातच पडले नगरपालिका आयुक्त; VIDEO मध्ये पाहा लोकांनी कसं वाचवलं

VIDEO मध्ये पाहू शकता की त्यांना बाहेर काढण्याचा पुरेपूर प्रयत्न केला जात आहे.

    गुजरात, 18 मे : गुजरातमधील नवसारी येथे नगरपालिका प्रमुख आणि चीफ ऑफिसर पावसानंतरची पाहणी करण्यासाठी गेले असताना नाल्यात पडल्याची घटना समोर आली आहे. तौत्के चक्रीवादळामुळे महाराष्ट्रासह गुजरातमध्येही मोठं नुकसान झालं आहे. मुसळधार पावसानंतर अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडणे, छप्पर उडणे याशिवाय भिंती कोसळल्याच्या घटना समोर आल्या आहेत. गुजरातच्या किनाऱ्यावर तौत्के चक्रीवादळ धडकल्यानंतर येथे नागरिकांना मुसळधार व सोसाऱ्याच्या वाऱ्याचा सामना करावा लागला. दरम्यान गुजरातमधील नवसारी भागात ही दुर्घटना घडली आहे. तौत्के चक्रीवादळामुळे गुजरातमध्ये विविध अपघातात 13 जणांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जात आहे. या सर्वांच्या नातेवाईकांनी प्रशासनाकडून मदत निधीही देण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. हे ही वाचा-VIDEO : महाभयंकर तौत्के चक्रीवादळाचा प्रवास आणि लँडफॉल कसा होता? दरम्यान गुजरातमधील नवसारी येथील नगरपालिका प्रमुख आणि चीफ ऑफिसर पावसानंतर विजलपोर आणि त्याच्या जवळ पाणी जमा झालेल्या भागाचं निरीक्षण करण्यासाठी गेले होते. दरम्यान ते व त्यांच्यासह काही जण नाल्यात पडले. त्यानंतर भागात एकच गोंधळ उडाला. तेथे उपस्थित असलेले लोक त्यांना बाहेर काढण्यासाठी वर खेचण्याचा प्रयत्न करीत होते. बराच वेळानंतर त्यांना सुखरुप बाहेर काढण्यात आले. यावेळी तीन ते चार जणं नाल्यात पडल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Cyclone, Gujrat, Viral video.

    पुढील बातम्या