जैसलमेर, 19 जानेवारी: भारत असो किंवा इतर कोणताही देश, बहुतेक ठिकाणी एका व्यक्तीला एकावेळी एकच पत्नी किंवा पतीसोबत राहण्याचा अधिकार (Marriage Rules In World) आहे. भारतामध्ये एकदा लग्न झाल्यानंतर घटस्फोटाशिवाय पुनर्विवाह करणे बेकायदेशीर आहे. पण आज आम्ही तुम्हाला राजस्थानमधील (Rajasthan) अशा गावाबद्दल माहिती देणार आहोत, जेथे प्रत्येक पुरुषानं दोन लग्न (Village Allowing two Marriage) केली आहेत. विशेष म्हणजे दोन लग्न करणाऱ्या संबंधित पुरुषाला ना कायदा शिक्षा करतो, ना त्याच्या बायका स्वतःच्या हक्कांसाठी लढतात. उलट दोन्ही बायका बहिणीप्रमाणे एकत्र नांदतात.
राजस्थानमधील जैसलमेर जिल्ह्यात असलेल्या रामदेओ गावात राहणारा प्रत्येक पुरुष दोन लग्न करतो. या लग्नांमागे खूप जुनी प्रथा आहे. या गावात ज्याने एकच लग्न केलं असेल, त्याच्या पत्नीला गर्भधारणा होत नाही आणि झालीच तर तिच्या पोटी मुलीचा जन्म होतो, असंही सांगितलं जातं. त्यामुळे लोक दुसरं लग्न करतात.
हे वाचा-OMG! थोडक्यात टळली दोन विमानांची टक्कर, कर्मचाऱ्यांकडून अक्षम्य चूक
सर्वांत आश्चर्याची गोष्ट म्हणजे प्रत्येक पुरुषाच्या दुसऱ्या पत्नीला मुलगाच होतो. अशा परिस्थितीत वंशाच्या दिव्यासाठी दुसऱ्या लग्नाचा अट्टहास केला जातो. याठिकाणी संबंधित पुरुषाच्या दोन्ही बायका बहिणींप्रमाणे एकत्र राहतात. खरं तर, प्रत्येकाला या परंपरेबद्दल माहिती आहे. त्यामुळेच महिलांनी पतीचं दुसरं लग्न हे स्वतःचे नशीब असल्याची समजूत करून घेतली असून, त्या पतीच्या दुसऱ्या बायकोसोबत राहतात.
नव्या पिढीतील लोक मात्र या प्रथेकडे पाठ फिरवत आहेत. हे केवळ बेकायदेशीरच नाही, तर एखादा पुरुष पुन्हा लग्न करण्यासाठी निमित्त हवे, यासाठीच ही प्रथा पाळत असल्याचे नव्या पिढीचे मत आहे. या विचित्र प्रथेमुळे हे गाव प्रसिद्ध आहे. पोलिसांनाही या गावातील या प्रथेची माहिती आहे. असे असतानाही येथे दुसरं लग्न केल्याबद्दल कोणालाही अटक होत नाही.
हे वाचा-आश्चर्य! 4 हात आणि 4 पाय; भारतात जन्माला आलं असं विचित्र बाळ; डॉक्टर म्हणाले...
लग्न हा जगातील सर्वांत खास क्षण मानला जातो, ही एक खूप सुंदर भावना आहे. लग्नासाठी तरुण-तरुणी तयारी करत असतात. पण दुसरं लग्न म्हटलं तर कुठल्याही मुलीला किंवा मुलाला ते मान्य होणार नाही कारण प्रत्येकाला आपला जोडीदार प्रिय असतो. राजस्थानात मात्र परंपरा पाळली जाते आणि पाळणारे त्याचा आदर करतात म्हणून कायदाही अपवाद म्हणून कारवाई करत नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.