या राज्याला असणार 5 उपमुख्यमंत्री; काय आहे कारण?

जगनमोहन रेड्डी शनिवारी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.

News18 Lokmat | Updated On: Jun 7, 2019 03:17 PM IST

या राज्याला असणार 5 उपमुख्यमंत्री; काय आहे कारण?

अमरावती, 07 जून : एका राज्याला एक मुख्यमंत्री आणि एक उपमुख्यमंत्री हे साधं सरळ गणित सर्वांना माहित आहे. पण, असं एक राज्य आहे ज्याला 1 मुख्यमंत्री आणि 5 उपमुख्यमंत्री असणार आहेत. आंध्र प्रदेश असं या राज्याचं नाव आहे. लोकसभेसह विधानसभा निवडणुकीत यश मिळवल्यानंतर वायएसआर काँग्रेसचे जगनमोहन रेड्डी शनिवारी आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. तर, यावेळी 5 उपमुख्यमंत्र्यांना शपथ दिली जाणार आहे. जगनमोहन रेड्डी यांच्या मंत्रिमंडळामध्ये पाच उपमुख्यमंत्र्यांसह 25 जणांना शपथ दिली जाणार आहे. शनिवारी अमरातवतीत हा शपथविधी सोहळा पार पडण्याची शक्यता आहे. जातीचं राजकारण साधण्यासाठी राज्याच्या पाच विविध भागांमधून 5 उपमुख्यमंत्र्यांना शपथ दिली जाणार आहे.

काय म्हणाले जगनमोहन रेड्डी

शिवाय, ज्या आमदरांना मंत्रीपद मिळणार नाही त्यांच्यावर देखील वेगळी जबाबदरी देण्यात येणार आहे. वायएसआर काँग्रेसनं टीडीपीचा पराभव करत राज्यात सत्ता मिळवली आहे. त्यामुळे पक्षात कुठंही नाराजी राहू नये याची काळजी जगनमोहन रेड्डी घेताना दिसत आहेत.

आपण सर्वांनी 10 वर्षे खूप मेहनत घेतली. त्यानंतर आपण सत्तेत आलो. प्रत्येकाला संधी मिळेल. पण, त्यासाठी वाट देखील पाहा. जनतेचं आपल्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवण्यासाठी आपल्याल काम करायचं आहे असं आवाहन यावेळी जगनमोहन रेड्डी यांनी आमदारांना संबोधित करताना केलं.

आंध्र प्रदेशमध्ये जातीचं राजकारण देखील महत्त्वाचं आहे. राज्यात रेड्डी आणि कामास या जातीचं प्राबल्य आहे. तर, राज्यातील मागास जातींनी नेहमी चंद्रबाबु नायडू यांना आपला पाठिंबा दिलेला आहे. पण, यावेळी मात्र जगनमोहन रेड्डी यांनी चंद्रबाबु नायडूंचं वर्चस्व मोडण्यात यश मिळवलं आहे.

Loading...


भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीची गुंडगिरी; सुरक्षारक्षकाला बेदम मारहाण

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 7, 2019 03:17 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...