लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात लगीनघाई उरकता येणार पण...

लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात लगीनघाई उरकता येणार पण...

लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये सशर्त लग्न करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 02 मे : लॉकडाऊनचा दुसरा टप्पा 3 मेला संपल्यानंतर 4 मेपासून लॉकडाऊनचा तिसरा (Coronavirus Lockdown 3) टप्पा सुरू होणार आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने जाहीर केल्याप्रमाणे हा लॉकडाऊन 4 मेपासून 17 मेपर्यंत असणार आहे. याशिवाय मंत्रालयाने या कालावधीत असणाऱ्या निर्बंधाबाबत एक गाइडलाइनही प्रसिद्ध केली आहे. लॉकडाऊन 3 मध्ये देशाची विभागणी तीन झोनमध्ये कऱण्यात आली आहे. यात रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोनचा समावेश आहे. या सर्वांसाठी वेगवेगळ्या गाइडलाइन आहेत. यात ग्रीन आणि ऑरेंज झोनसाठी काही बाबतीत सूट देण्यता आली आहे.

लग्नसोहळ्यांना सशर्त परवानगी

दरम्यान ऑरेंज आणि ग्रीन झोनमधील काही नियम शिथिल करताना सोशल डिस्टंसिंग, मास्कचा वापर या गोष्टी अनिवार्य आहेत. ज्या काही गोष्टींमध्ये सरकारने सूट दिली आहे त्यामध्ये लांबणीवर पडलेल्या लग्नसोहळ्यांचा देखील समावेश आहे. या तिसऱ्या टप्प्यामध्ये सशर्त लग्न करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

(हे वाचा-लॉकडाऊमुळे सेलिब्रिटी शेफ पूजा धिंग्राला फटका,मुंबईतील प्रसिद्ध कॅफे करणार बंद)

त्यामधील महत्त्वाची अट म्हणजे वधूवराकडील एकूण 50 जणांना या लग्नसोहळ्यास उपस्थित राहण्याची परवानगी आहे. मास्क आणि सोशल डिस्टंसिंग तर बंधनकारक आहे. तसच अंत्यविधीसाठी आधीच्या नियमांप्रमाणेच केवळ 20 जणांना परवानगी असेल.

रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोननुसार नियम

लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये ग्रीन आणि ऑरेंज झोनमधील आर्थिक व्यवहारांना सशर्त परवानगी देण्यात आली आहे. मात्र रेड झोनमधील निर्बंध अधिक कठोर करण्यात आले आहेच. त्याचप्रमाणे सर्व झोनमध्ये काही सेवा पूर्णपणे बंदच राहतील. यामध्ये विमानसेवा, रेल्वे, मेट्रो आणि रस्त्याने आंतरराज्य वाहतूक बंद असेल. शाळा, कॉलेज, इतर शैक्षणिक संस्था, कोचिंग क्लासेस, हॉटेल, रेस्टॉरंट यांनाही सुरु करण्यास परवानगी नाही. गर्दी होणाऱ्या ठिकाणांपैकी सिनेमागृह, मॉल, जिम, स्पोर्ट कॉम्प्लेक्स बंद राहतील. तसेच सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या कार्यक्रमांचं आयोजन करता येणार नाही. गृहमंत्रालयामार्फत विमान, रेल्वे किंवा रस्ते प्रवासासाठी ज्यांना परवानगी दिली असेल ते प्रवास करू शकतात.

(हे वाचा-छोट्या व्यापाऱ्यांना दिलासा,मोदी सरकारच्या आदेशानंतर या बँकेची मोठी मदत)

लोकांच्या सुरक्षेच्या कारणास्तव काही पावलं उचलण्यात आली आहेत. यामध्ये वैयक्तिक स्तरावर होणारी वाहतूक, अनावश्यक व्यवहारांवर सायंकाळी 7 ते सकाळी 7 पर्यंत बंदी कायम राहील. स्थानिक प्रशासन कायद्यानुसार याची अंमलबजावणी करेल. सर्व झोनमध्ये 65 वर्षांवरील व्यक्ती जे आजारी आहेत, गर्भवती महिला, 10 वर्षांपेक्षा कमी वयाची मुलं यांनी घरीच रहावं असं सांगण्यात आलं आहे. ओपीडी, मेडिकल क्लिनिक यांना सर्व झोनमध्ये सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन करून सुरु करण्यास परवानगी आहे. कंटेनमेंट झोनमनध्ये ही सूट नाही.

संपादन - जान्हवी भाटकर

First published: May 2, 2020, 2:39 PM IST
Tags:

ताज्या बातम्या