• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • Weather Update: उत्तर भारतात अवकाळी पावसाचा धोका कायम; कशी असेल राज्यातील हवामानाची स्थिती?

Weather Update: उत्तर भारतात अवकाळी पावसाचा धोका कायम; कशी असेल राज्यातील हवामानाची स्थिती?

Weather in Maharashtra: मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात विविध ठिकाणी अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. आज महाराष्ट्रातील हवामान सामान्य राहणार असून पुढील तीन ते चार दिवसात राज्यातील हवामानात बदल होण्याची शक्यता आहे.

 • Share this:
  मुंबई, 17 एप्रिल: मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात अवकाळी पावसानं (Unseasonal rain) हजेरी लावली आहे. उत्तर भारतातील बहुतांशी राज्यांना आजही अवकाळी पावसाचा धोका कायम आहे. उत्तर प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश, बिहार आणि झारखंडसह दक्षिणेतील काही राज्यात आज तुरळक ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. पुढील चोवीस तासांत या राज्यांमध्ये मेघगर्जना आणि विजेच्या कडकडासह जोरदार अवकाळी पाऊस कोसळणार आहे. असं असलं तरी महाराष्ट्रात अवकाळी पावसाचं सावट दूर झालं आहे. आज राज्यात आकाश नीरभ्र असून राज्यात विविध ठिकाणी तापमानाचा पारा वाढणार असल्याची माहिती हवामान खात्यानं दिली आहे. काही दिवस महाराष्ट्रातील नागरिकांना उष्णतेपासून दिलासा दिल्यानंतर आता पुढील तीन ते चार दिवसांत राज्यातील तापमान वाढणार आहे. तर विदर्भासह मराठवाड्यातील काही जिल्ह्यात तापमानाचा पारा 40 ते 42 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहणार आहे. त्यामुळे येथून पुढे खऱ्या अर्थानं राज्यात उन्हाळा सुरू होणार आहे. दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील सातारा, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, नाशिक या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी गारपीट झाली आहे. दरम्यान सातारा जिल्ह्यातील रस्तांना तर बर्फाच्छादित प्रदेशाचं स्वरूप आलं होतं. या गारपीटीमुळे औरंगाबादसह नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या द्राक्षांच्या बागाचं प्रचंड नुकसान झालं आहे. पण आता महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचा घोंघवणारे ढग दूर झाले आहेत. येत्या काळात महाराष्ट्राला उष्णतेचा तडाखा बसणार आहे. हे ही वाचा- मोठी बातमी! यावर्षी कसा असेल मान्सून; हवामान खात्यानं दिली महत्त्वाची माहिती काय असेल मुंबईतचं हवामान? पुढील काही दिवस मुंबईसह कोकण पट्ट्यात कमाल तापमानाचा सरासरी तापमानाच्या कमीचं राहणार आहे. तर मुंबईतील कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 27 अंश सेल्सिअस इतक राहणार आहे. मुंबईत तापमानाचा पारा जरी सरासरी तापमानाच्या खाली गेला असला तरी हवामानातील आर्द्रतेमुळे मुंबईतील तापमान चाळीशी पार असल्याचा अनुभव नागरिकांना येत आहे. कोकणातील तापमान 34 ते 36 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहाणार आहे.
  Published by:News18 Desk
  First published: