मुंबई, 15 मे : उकाड्यानं हैराण झालेले नागरिक आणि बळीराजा भाताच्या पेरणीसाठी मान्सूनची आतूरतेनं वाट पाहात असतो. मान्सून (Monsoon) वेळत आला तर शेतीची कामं योग्य मार्गी लागतात. मान्सून येण्यास विलंब झाला तर पाऊस लांबणीवर पडण्याची शक्यता असते. जून ते सप्टेंबर या कालावधित चांगला पाऊस होणं हे पाणी शेतीच्या दृष्टीनं फायद्याचं असतं. दक्षिण भारतातून मान्सून (Monsoon) उत्तरेकडे येत असतो. यंदा मान्सून 4 दिवस उशिरानं येणार आहे. 1 जून ऐवजी 5 जूनला केरळमध्ये दाखल होईल असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
Forecast for the 2020 SW Monsoon Onset over Kerala
This year, the onset of s-west monsoon over Kerala is likely to be slightly delayed as compared to normal date of onset of 1st June. Its onset over Kerala this year is likely to be on 5th June with a model error of ± 4 days. pic.twitter.com/TRX1miwkUA
मागच्या वर्षी केरळमध्ये 6 जून रोजी मान्सून केरळात दाखल होईल असा अंदाज होता मात्र 8 जूनपर्यंत 2 दिवस उशिरा दाखल झाला. केरळमध्ये जर मान्सून उशिरा दाखल झाला तर उर्वरीत भारतातही मान्सूनचं वेळापत्रक बदलतं.पिकांची पेरणी त्यावर अवलंबून असते त्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वजण मान्सूनची चातकासारखी वाट पाहात असतात. हवामान खात्यानं 1961 ते 2019 दरम्यान 58 वर्षांच्या मान्सूनचा अभ्यास केला. त्यानुसार परतीच्या प्रवासावर त्याचं आगमन आणि प्रवास यात काही बदल झाले आहेत.
दिल्लीमध्ये मान्सून 23 जून ऐवजी 27 जून रोजी दाखल होईल तर मुंबईमध्ये 10 जून ऐवजी 11 ला दाखल होणार होता त्याऐवजी तो पुढे जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, यंदा मान्सून पाऊस सामान्य होईल. त्यानुसार 2020 मध्ये मान्सून सरासरीच्या 100 टक्के म्हणजे चांगला होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.