देशात काही भागांत आज मुसळधार पावसाची शक्यता, या तारखेपर्यंत होणार मान्सूनचं आगमन

देशात काही भागांत आज मुसळधार पावसाची शक्यता, या तारखेपर्यंत होणार मान्सूनचं आगमन

भारतासाठी चार महिने पाऊस पडणं फार महत्वाचे आहे. कारण आपल्या देशाची अर्थव्यवस्था आता शेतीवर अवलंबून आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 29 मे : गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या उष्णतेमुळे (Heat) आज लोकांना दिलासा मिळाला आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (Indian Meteorological Department)आज देशातील बहुतांश भागात वादळी वारे आणि पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविला आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, येत्या 24 तासांत दिल्ली, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, झारखंड, बिहार आणि पश्चिम बंगालसह उत्तर भारतातील बर्‍याच भागात वादळी वारे व पाऊस पडण्याचा अंदाज आहे.

भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) वर्तवलेल्या अंदाजानुसार, 1 जूनच्या सुमारास पहिला मान्सून दक्षिणेकडील किनाऱ्यावरून भारतात प्रवेश करण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने गुरुवारी सांगितलं की, भारतासाठी चार महिने पाऊस पडणं फार महत्वाचे आहे. कारण आपल्या देशाची अर्थव्यवस्था आता शेतीवर अवलंबून आहे.

हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, उत्तर भारतात झालेल्या पावसामुळे, उत्तर-पश्चिम आणि मध्य भारतात उष्णतेतून आराम मिळू शकेल. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, येत्या दोन दिवसांत पश्चिम बंगालमध्ये जोरदार वारे आणि पाऊस पडण्याची शक्यता आहे.

बदलत्या हवामानामुळे मान्सूनला केरळपर्यंत पोहोचण्यास उशीर होऊ शकेल, असं हवामान खात्याने म्हटलं होतं. केरळमध्ये दरवर्षी मान्सूनने 1 जूनला पावसाची हजेरी असते. परंतु यावेळी 5 जूनपर्यंत केरळमध्ये पोहोचणे अपेक्षित होतं. अंदमानात मान्सून तयार होताना दिसत आहे. हवामानाचे बदल लक्षात येता एक जूनपर्यंत मान्सून येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता

हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, येत्या तीन दिवस उष्णतेपासून मुक्तता मिळणार असून देशाच्या बर्‍याच भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने 30 आणि 31 मे रोजी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तसेच, येत्या 24 तासांत त्रिपुरा, मिझोरम, आसाम आणि मेघालयात मुसळधार पावसाचा अंदाज आहे.

संपादन - रेणुका धायबर

First published: May 29, 2020, 11:40 AM IST

ताज्या बातम्या