मराठी बातम्या /बातम्या /देश /Weather Update : IMD कडून अलर्ट! विकेण्डला हवामानात होणार मोठा बदल

Weather Update : IMD कडून अलर्ट! विकेण्डला हवामानात होणार मोठा बदल

weather forecast

weather forecast

कुठे पाऊस तर कुठे कडाक्याची थंडी! हवामान विभागाकडून या राज्यांना अलर्ट

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई : देशातील हवामान वेगानं बदलत आहे. कडाक्याची थंडी तर कुठे पावसाने धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. काही ठिकाणी तर दमट हवामान राहील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर काही ठिकाणी कोरडी थंडी आहे. गुरुवारी तामिळनाडूच्या दक्षिण किनारपट्टीवर मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला.

दिल्ली-एनसीआर, यूपी, बिहार, राजस्थान, पंजाब, हरयाणामध्ये हवामान कोरडे राहिले आणि थंड वारे वाहत होते. दिवसा उन्हामुळे लोकांना थंडीपासून दिलासा मिळाला. मात्र, अजूनही रात्री कडाक्याची थंडी आहे. त्यामुळे उत्तर भारतातील अनेक भागात २ ते ३ अंशांची तापमानात घसरण झाल्याचं पाहायला मिळालं.

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात थंडीसह पावसाची शक्यता, विचित्र हवामानाचा फटका बसण्याची शक्यता

स्कायमेटने दिलेल्या माहितीनुसार, उत्तराखंडमध्ये आज पावसाची शक्यता आहे. तर तामिळनाडू आणि केरळच्या दक्षिण भागातही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. गिलगिट-बाल्टिस्तान, मुजफ्फराबाद, लडाख, जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेशच्या काही भागात येत्या २४ तासांत हलका ते मध्यम पाऊस आणि बर्फवृष्टी होऊ शकते.

पंजाब, हरयाणा आणि पश्चिम राजस्थानच्या काही भागात रात्रीच्या किमान तापमानात किंचित वाढ होण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने उत्तराखंडमधील चमोली, पिथौरागढ, रुद्रप्रयाग आणि उत्तरकाशी या चार जिल्ह्यांमध्ये तीन हजार मीटरपेक्षा जास्त उंचीवरील भागात हिमस्खलनाचा इशारा दिला आहे. त्यामुळे प्रशासन अलर्टवर आहे.

Crop Damage Untimely Rain : अवकाळी पावसाने कांदा; केळी महाग होण्याची शक्यता, शेतीचे मोठे नुकसान

मुंबईसह कोकण भागात आज कमाल तापामानत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विकेण्डला उकाड्याने नागरिक हैराण होऊ शकतात. मुंबईतसह उपनगरात थंडी कमी होत असून उष्णता वाढत आहे.

मध्य महाराष्ट्रात बऱ्यापैकी अजून गारवा आहे. विदर्भातही नांदेड वगळता बाकी जिल्ह्यांमध्ये किमान आणि कमाल तापमान फार वाढण्याची शक्यता कमी असल्याचं IMD कडून अंदाज वर्तवण्यात आला आहे.

First published:

Tags: IMD, IMD FORECAST, Weather Update