Home /News /national /

Weather Update: 'या' राज्यांमध्ये वादळी पावसाची हजेरी, दिल्लीत 80 झाडं उन्मळली; 100 विमानं उशीरानं

Weather Update: 'या' राज्यांमध्ये वादळी पावसाची हजेरी, दिल्लीत 80 झाडं उन्मळली; 100 विमानं उशीरानं

Weather Update: देशाची राजधानी दिल्लीसह उत्तर प्रदेश, ओडिशा, हिमाचल प्रदेशात मुसळधार (Delhi, Uttar Pradesh, Odisha and Himachal Pradesh)पाऊस पडत आहे.

    नवी दिल्ली, 24 मे: गेल्या अनेक दिवसांपासून वाहत असलेल्या उष्ण वाऱ्यांमुळे आता देशातील काही राज्यांतील लोकांना दिलासा मिळू लागला आहे. देशाची राजधानी दिल्लीसह उत्तर प्रदेश, ओडिशा, हिमाचल प्रदेशात मुसळधार (Delhi, Uttar Pradesh, Odisha and Himachal Pradesh)पाऊस पडत आहे. त्याचबरोबर या राज्यांमध्ये येत्या काही दिवसांत पावसाची शक्यता हवामान खात्याने (Meteorological Department) वर्तवली आहे. सोमवारी मुसळधार पाऊस आणि वादळामुळे दिल्लीत दिलासा आणि आपत्ती दोन्ही आली. पाऊस आणि वादळामुळे उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला. त्याचबरोबर सकाळच्या वेळी रस्ता आणि वाहतुकीवर परिणाम झाला. 60-90 किमी प्रतितास वेगाने वाहणाऱ्या जोरदार वाऱ्यामुळे विविध ठिकाणी सुमारे 80 झाडे उन्मळून पडली. सुमारे 100 उड्डाणे उशीरानं चालली तर 19 उड्डाणे डायव्हर्ट करावी लागली. याशिवाय छत आणि भिंत कोसळण्याच्या वेगवेगळ्या घटनांमध्ये सुमारे दहा जण जखमी झाले आहेत. वातावरणातील बदलाचा परिणाम तापमानावरही झाला. 2004 नंतर पहिल्यांदाच किमान तापमानाची नोंद झाली. 2004 मध्ये किमान तापमान 16.7 °C होते आणि सोमवारी सकाळी किमान तापमान 17.2 °C होते. येत्या काही दिवसांत किमान तापमान सामान्यापेक्षा कमी राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. हवामान खात्याचं म्हणणं आहे की, सध्या वायव्य भारतात वेस्टर्न डिस्टर्बन्स सक्रिय आहे. त्याचा परिणाम दिल्ली-एनसीआरवर होत आहे. त्यामुळे सोमवारी सकाळी मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. यासोबतच 60-90 किमी प्रतितास वेगाने धुळीचे वादळ आले. त्यामुळे किमान तापमानात मोठी घसरण झाली. येत्या काही दिवसांतही किमान तापमानात फारशी वाढ होणार नाही. ते सुमारे 20 अंश सेल्सिअस राहील. ओडिशात वादळी पाऊस ANI नुसार, ओडिशाच्या हवामान विभागाचे संचालक एचआर विश्वास यांनी म्हटले आहे की, मुख्यतः उत्तर ओडिशा आणि किनारी जिल्ह्यांमध्ये गडगडाट आणि विजांचा कडकडाट सुरू राहील. अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस आणि जोरदार वारे वाहू शकतात. 25 मे रोजी गडगडाटी वादळाचा वेग कमी होण्याची अपेक्षा आहे, मात्र ओडिशाच्या किनारपट्टीवर एकटा पाऊस सुरूच राहील. त्याचवेळी हिमाचलच्या हवामान केंद्राचे प्रमुख सुरिंदर पॉल यांनी सांगितलं की, हिमाचल प्रदेशातील सर्व जिल्ह्यांमध्ये पावसाची माहिती आहे. लाहौल आणि स्पिती आणि किन्नौरमध्ये हलकी बर्फवृष्टी झाली आहे. यासोबतच काही जिल्ह्यांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाचा जोर कायम राहणार आहे. येत्या काही दिवसांत कमी तीव्रतेचा पाऊस पडेल. त्याचवेळी सोमवारी रात्री उत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस झाला. IMD च्या हवाल्यानुसार, उत्तर पाकिस्तानमधून येणार्‍या अतिरिक्त-उष्णकटिबंधीय हवामान प्रणालीमुळे पावसाचे ढग निर्माण झाले. त्यामुळे पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशच्या काही भागात सोमवारी पाऊस झाला. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, उत्तराखंडमध्ये अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह हलका पाऊस झाला. त्याचबरोबर जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेशच्या बहुतांश भागातही पाऊस झाला आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, येत्या पाच दिवसांत पश्चिम राजस्थान वगळता देशात इतरत्र कुठेही उष्णतेची लाट येण्याचा अंदाज नाही. सोमवारी सकाळी उत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस झाला. तर गाझियाबाद, नोएडा, अलीगढ, बुलंदशहर, मथुरा, मेरठ आणि लखनऊसह उत्तर प्रदेशातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये रिमझिम किंवा हलक्या पावसाने वातावरण आल्हाददायक बनलं आहे. याशिवाय उत्तर प्रदेशात 25 मेपर्यंत पाऊस सुरू राहण्याची शक्यता हवामान खात्यानं व्यक्त केली आहे.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Delhi, Himachal pradesh, Rain

    पुढील बातम्या