खुशखबर! मान्सूनसंदर्भात IMD कडून आली एक चांगली बातमी!

खुशखबर! मान्सूनसंदर्भात IMD कडून आली एक चांगली बातमी!

मान्सून उशीरा दाखल होईल, पण चांगला बरसेल, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने IMD वर्तवला आहे. जून ते सप्टेंबर काळात सरासरी 96 टक्के पाऊस होईल. कुठल्या महिन्यात कुठे, किती पाऊस पडेल याचा अंदाज....

  • Share this:

मुंबई, 31 मे : भारतीय हवामान खात्यानं वर्तवलेल्या ताज्या अंदाजानुसार यंदा पाऊस समाधानकारक होणार आहे. जून ते सप्टेंबर या काळात देशभरात पाऊस सरासरीएवढा होईल, अशी दिलासादायक बातमी आली आहे. राज्यात उन्हाचा कहर वाढला असताना पावसाची शक्यता लांबल्याने चिंता वाढली होती. त्यात ही त्यातल्या त्यात चांगली बातमी आली आहे.

दरवर्षी साधारण 1 जूनला केरळात दाखल होणारा मान्सून यंदा उशीरा येणार असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. अंदमान निकोबार बेटांवर मान्सूनचं आगमन झालेलं आहे. पण पुढची वाटचाल संथ गतीने होत आहे. साधारण 6 जूनला मान्सून केरळात येईल, असा ताजा अंदाज आहे. राज्यात दाखल होण्यासाठी किमान 15 ते 17 जून उजाडेल असा अंदाज आहे.

पाऊस समाधानकारक होणार असल्याने महागाई आटोक्यात राहील. ताज्या अंदाजानुसार, दक्षिण भारतात सरासरीच्या 97 टक्के पाऊस होईल. ईशान्य भारतात 91 टक्के पावसाचा अंदाज आहे. भारतीय हवामान खात्याने (IMD) यावर्षी उत्तर आणि पश्चिम भारतात 94 टक्के पाऊस होईल असा अंदाज वर्तवला आहे. मध्य भारतात यंदा मोसमी पाऊस सर्वाधिक बरसणार आहे. तिथे 100 टक्के पावसाचा अंदाज आहे.

जून ते सप्टेंबर काळात सरासरी 96 टक्के पाऊस होईल. जुलैमध्ये पावसाचं प्रमाण साधारण किंवा कमी असेल. ऑगस्टमध्ये मात्र चांगला पाऊस होईल, असा अंदाज आहे.

निर्मला सीतारामन यांचा पुन्हा एकदा नवा रेकॉर्ड!

VIDEO : नाशिकची 'लेडी सिंघम', दरोडेखोरासोबत एकटीने दिली झुंज

ऊस सक्रिय होण्यासाठी आवश्यक परिस्थिती हिंदी महासागरात निर्माण झालेली नाही. पाऊस कधी येणार आणि याबाबत वेगवेगळी माहिती पुढं येते आहे. याबाबत राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेचे वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि मान्सूनतज्ञ डॉ. एम.आर.रमेशकुमार यांनी दिलेली माहिती चिंता वाढविणारी आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार यंदाचा पाऊस कमालीचा लांबणार आहे. सगळी परिस्थिती योग्य राहिली तर 15 जून पर्यंत पाऊस गोवा आणि महाराष्ट्रात येऊ शकतो अशी माहिती त्यांनी दिली.

मान्सून सक्रिय होण्यासाठी लागणारी स्थिती समुद्रात नाही. ढग निर्मितीसाठीची आद्रता आणि वारा खोल समुद्रात नाही. त्यामुळे मान्सून खूपच लांबणार आहे याचा परिणाम शेती व्यवसायावर होणार असून आणखी काही दिवस सर्वांना उन्हाच्या झळा सोसाव्या लागणार आहेत.

पाऊस लांबला तरी यंदाचा पाऊस समाधानकारक असेल आणि त्यावर अल निनोचा कोणताच परिणाम असणार नाही असंही माहितीही डॉ. रमेशकुमार यांनी दिली.

असं असतं पावसाचं वेळापत्रक

सरासरी १ जूनला केरळात दाखल

८ जून पर्यंत राज्यात दाखल

यंदा ८ जूनला केरळमध्ये येणार

राज्यात १५ ते १७ जून उजाडणार

मान्सूनचा इतिहास

१८ जून १९७२ ला सर्वांत उशिरा  - मोठा दुष्काळ

११ मे १९१८ ला सर्वात लवकर मान्सून दाखल

सरासरी ४५ दिवसात संपूर्ण देश व्यापणारा मान्सून २०१३ मध्ये १६ दिवसात साऱ्या देशात सक्रिय झाला होता

२००२ मध्ये देशभर सक्रिय होण्यासाठी ७६ दिवस लागले होते.

First published: May 31, 2019, 3:51 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading