• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • Weather Forecast: उत्तर-मध्य भारतात पावसाची जोरदार हजेरी; कशी असेल महाराष्ट्रातील स्थिती?

Weather Forecast: उत्तर-मध्य भारतात पावसाची जोरदार हजेरी; कशी असेल महाराष्ट्रातील स्थिती?

Weather Forecast: काही दिवसांपूर्वी बंगालच्या उपसागरात (Bay of Bengal) तयार झालेला कमी दाबाचा पट्टा (Low Pressure zone) आता झारखंडच्या दिशेनं पुढे सरकला आहे.

 • Share this:
  पुणे, 01 ऑगस्ट: काही दिवसांपूर्वी बंगालच्या उपसागरात (Bay of Bengal) तयार झालेला कमी दाबाचा पट्टा (Low Pressure zone) आता झारखंडच्या दिशेनं पुढे सरकला आहे. त्यामुळे राज्यातील पाऊस गायब झाला आहे. सध्या मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशमध्ये नव्यानं कमी दाब पट्टा सक्रिय झाला आहे. हा कमी दाबाचा पट्टा राज्यस्थानच्या गंगानगरपर्यंत विस्तारला आहे. त्यामुळे सध्या राज्यस्थान, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशात पावसाचा जोर वाढला (Heavy rainfall) आहे. याठिकाणी बहुतांशी जिल्ह्यांना हवामान खात्यानं रेड अलर्ट (Red alert) जारी केला आहे. मागील दोन दिवसांपासून याठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. हेही वाचा- कोरोनाचा 'सुपर म्यूटेंट व्हेरिअंट' ठरणार महाघातक, 3 पैकी एकाचा होईल मृत्यू, शास्त्रज्ञांचा इशारा दुसरीकडे, महाराष्ट्रात मात्र सर्वदूर पावसानं विश्रांती घेतली आहे. विदर्भात काही ठिकाणी हलक्या पावसाची नोंद केली आहे. पण आज राज्यात सर्वत्र कोरडं हवामान राहणार असल्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. पुढील दोन दिवस राज्यात पावसाची हीच स्थिती कायम राहणार असून राज्यात पावसाची खूप कमी शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रात आणि विदर्भात मात्र काही ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. हेही वाचा-मोदी सरकारने जाहीर केली Corona Hotspot ठरणारी 10 राज्य! महाराष्ट्राचाही समावेश मंगळवारी आणि बुधवारी म्हणजेच 3 आणि 4 ऑगस्ट रोजी कोकणातील काही जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. मंगळवारी ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या चार जिल्ह्यांना हवामान खात्यानं येलो अलर्ट दिला आहे. तर बुधवारी रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत वरुणराजा बरसणार आहे. गेल्या आठवड्यात कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात जोरदार हजेरी लावल्यानंतर राज्यातून एकाकी पाऊस गायब झाला आहे.
  Published by:News18 Desk
  First published: