साडी नेसून महिलेचा मार्शल आर्ट, व्हायरल VIDEO चर्चेत

साडी नेसून महिलेचा मार्शल आर्ट, व्हायरल VIDEO चर्चेत

महिलांची ताकद अतिशय सुंदर आणि कलात्मकरित्या सादर केल्याची चर्चा आता सोशल मीडियावर रंगत आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 04 फेब्रुवारी : हल्लीच्या मुलींना साडी घालून साधं चालणं ही कठीण होऊन जातं, अशा वेळी साडी घालून मार्शल आर्ट कोणी केलं असेल, ही कल्पना तुम्ही कराल का? पण, ही किमया एका महिलेने केली आहे. आणि तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमुळे मार्शल आर्ट सादर करणारी महिला चांगलीच चर्चेत आली आहे. महिलांची ताकद अतिशय सुंदर आणि कलात्मकरित्या सादर केल्याची चर्चा आता सोशल मीडियावर रंगत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ सिलमबम प्रॅक्टिशनर ऐश्वर्या मणिवनन यांचा आहे. मार्शल आर्ट सादर करतानाचा हा व्हिडिओ त्यांनी हँडलूमची साडी तयार करणाऱ्या कारीगरांना समर्पित केला आहे. मार्शल आर्ट सारखे कठीण प्रकार कॉटन साडीप्रमाणे हँडलूम साडीमध्येही करणं सहज शक्य आहे.

सिलमबम हे तमिलनाडूच्या मार्शल आर्टची एक शैली आहे, जी जवळपास तीन हजार वर्ष जुनी असल्याचं सांगितलं जातं. या प्रकाराला महिला विशेषत: साडी परिधान करूनच करतात. ऐश्वर्याचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.

आपली ही पारंपरिक कला आपण जपली असती तर आज अनेक महिला, मुलींना सुरक्षित वाटले असते, अशा आशयाच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर येऊ लागल्या आहेत.

First published: February 5, 2020, 8:36 AM IST
Tags: saree

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading