नर्मदा, ३१ ऑक्टोबर : सरदार वल्लभभाई पटेल नसते तर देशात फिरायला व्हिसा - पासपोर्ट काढावा लागला असता, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पटेल यांच्या कार्याचा गौरव केला. नर्मदा जिल्ह्यातल्या केवाडिया इथे स्टॅच्यु ऑफ युनिटी नावानं उभ्या राहिलेल्या सरदार पटेल यांच्या पुतळ्याचं अनावरण पंतप्रधानांच्या हस्ते झालं. पटेलांच्या १४२व्या जयंतीच्या निमित्ताने हा कार्यक्रम झाला. गृहमंत्री राजनाथ सिंह यांनीसुद्धा याच अर्थाचं वक्तव्य रन फॉर युनिटीला हिरवा झेंडा दाखवताना केलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Gujrat, Narendra modi, Narmada, Rajnath singh, Sardar vallabhai patel, Statue of unity