दिल्लीत 45 जागा आम्हीच जिंकू, अमित शहांनी केला दावा; काय असेल नवं समीकरण?

दिल्लीत 45 जागा आम्हीच जिंकू, अमित शहांनी केला दावा; काय असेल नवं समीकरण?

भाजपला लोकसभा निवडणुकीत दिल्लीतील सर्व 7 जागांवर विजय मिळाला होता. मात्र..

  • Share this:

नवी दिल्ली, 8 फेब्रुवारी : काही वेळापूर्वीच दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात झाली आहे. दिल्लीत यंदा कोण सत्ता स्थापन करणार, हे जाणून घेण्याची उत्सुकता सर्वांनाच आहे. आज दिल्लीतील 70 जागांवर मतदान होणार आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या मतदानापूर्वीच  भाजपचे चाणक्य अमित शहा यांनी 70 पैकी 45 जागा जिंकण्याचा दावा केला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लोकसभा निवड़णुकीत मिळालेल्या जनादेशाचा विचार केला असतान भाजप 45 जागांवर विजय मिळविण्याचा दावा करीत आहे. 70 सदस्यीय विधानसभा जागा असलेल्या दिल्लीत लोकसभेच्या 7 जागा आहे. भाजपला लोकसभा निवडणुकीत दिल्लीतील सर्व 7 जागांवर विजय मिळाला होता. मात्र अमित शहांचा दावा कितपत सत्यात उतरतो हे 11 फेब्रुवारी रोजी समोर येईल. आज दिल्ली विधानसभा निवड़णुकीचे मतदान होणार असून दोन दिवसांनी म्हणजे 11 फेब्रुवारी रोजी निवडणुकीचा निकाल समोर येईल. पक्षाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजप अध्यक्ष जे.पी.नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमिश शहा यांनी स्वत: दिल्लीच्या सर्व भाजप खासदारांची जबाबदारी घेतली असून त्यांना दिल्लीची सत्ता आपच्या हातून काढून घेण्याचे आवाहन केलं आहे.

दिल्ली विधानसभेच्या (Delhi Assembly Elections 2020)70 जागांसाठी आज मतदान होत आहे. सकाळी 8 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मतदान केंद्राबाहेर पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 15, 750 मतदान केंद्रांवर मतदारांसाठी विशेष सुविधा देण्यात आल्या आहेत. दिल्लीतील 47 लाख 86 हजार 389 मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. दिल्लीमध्ये आप विरुद्ध भाजप अशी दुहेरी चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. अनेक राज्यांमधील विधानसभा निवडणुकीत भाजपचा सुपडा साफ झाल्यानंतर आता आणखी एक राज्य भाजपच्या हातून निसटणार की भाजप आपलं कमळ राजधानी दिल्लीत फुलवण्यात यशस्वी होणार हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळे भाजपसाठी ही सर्वात महत्त्वाची निवडणूक मानली जात आहे. तर दुसरीकडे आपचं सरकार येणार असल्याचा कौल नवी दिल्लीतील जनतेनं दिली आहे. घोडा मैदान लांब नाही अवघ्या 3 दिवसांत म्हणजेच 11 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे.

First published: February 8, 2020, 8:22 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading