मराठी बातम्या /बातम्या /देश /'...तर सोलापूर, सांगली कर्नाटकात घेऊ'; गृहमंत्र्यांनी उधळली मुक्ताफळे

'...तर सोलापूर, सांगली कर्नाटकात घेऊ'; गृहमंत्र्यांनी उधळली मुक्ताफळे

त्यांच्या या वादग्रस्त विधानाने पुन्हा एकदा आगीत तेल ओतण्याचं काम केलं आहे.

त्यांच्या या वादग्रस्त विधानाने पुन्हा एकदा आगीत तेल ओतण्याचं काम केलं आहे.

त्यांच्या या वादग्रस्त विधानाने पुन्हा एकदा आगीत तेल ओतण्याचं काम केलं आहे.

बंगळुरु, 18 जानेवारी : काल हुतात्मादिनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या ट्वीटनंतर वाद पेटला आहे. त्यांच्या ट्वीटनंतर कर्नाटकातील कानडी संघटनांनी उद्धव ठाकरेंचे आक्षेपार्ह पोस्टर घेऊन आंदोलन केलं. आता कर्नाटकच्या गृहमंत्र्यांनी मुक्ताफळं उधळली आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांतील सीमावादात ते म्हणाले की, सोलापूर, सांगली कर्नाटकात विलीन करू अशी मुक्ताफळे कर्नाटकचे गृहमंत्री बसवराज बोंमई यांनी केलं आहे. त्यांच्या या वादग्रस्त विधानाने पुन्हा एकदा आगीत तेल ओतण्याचं काम केलं आहे.

यापूर्वी कर्नाटकचे मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांनी म्हटलं की, 'हे दुर्दैव आहे, मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यानी केलेल्या वक्तव्याचा निषेध करतो. आमच्या ताब्यात असलेली एक इंचही जमीन आम्ही महाराष्ट्राच्या वाट्याला येऊ देणार नाही. कर्नाटकचे गृहमंत्री पुढे म्हणाले की, सीमाप्रश्नी आमची बाजू यापूर्वीच सिद्ध झाली आहे. सोलापूर आणि सांगलीत मोठ्या संख्येने कन्नड भाषिक असल्याचा दावा बोमई यांनी केला आहे. बोमई यांच्या विधानावर महाराष्ट्र राज्य सरकार काय प्रतिक्रिया देणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. उद्धव ठाकरे यांच्या हुतात्मा दिनाच्या ट्वीटनंतर कर्नाटक राज्यात खळबळ उडाली होती. कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी केलेल्या निषेधानंतर गृहमंत्री बोमई यांनाही पोटशूळ उठला आहे.

काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल (17 जानेवारी) कर्नाटक– महाराष्ट्र सीमा लढ्यात आपल्या प्राणाचं बलिदान देण्याऱ्या लोकांना हुतात्मा दिनी अभिवादन केलं होतं. त्यावेळी मुख्यमंत्री म्हणाले होते की, महाराष्ट्रात समाविष्ट होण्यासाठी प्राणपणाला लावणाऱ्या सीमा लढ्यातील हुतात्म्यांना आजच्या हुतात्मा दिनी विनम्र अभिवादन. सीमा प्रश्नात सर्वस्वाची होळी करणारे हुतात्मे आणि त्यांच्या त्याग, समर्पणात होरपळूनही आजही या लढ्यात धीराने आणि नेटाने सहभागी कुटुंबियांना मानाचा मुजरा..!

First published:

Tags: Karnataka, Sangli, Solapur