संविधानातून 'धर्मनिरपेक्ष' शब्द काढून टाकणार- अनंतकुमार हेगडे

संविधानातून 'धर्मनिरपेक्ष' शब्द काढून टाकणार- अनंतकुमार हेगडे

संविधानात बदलही करता येतात. आणि त्यासाठीच आम्ही निवडून आलो आहोत असंही ते म्हणाले आहेत.

  • Share this:

26 डिसेंबर: भारतीय संविधानातून धर्मनिरपेक्ष हा शब्द काढून टाकणार  असे संकेत केंद्रीय मंत्री अनंत कुमार हेगडे यांनी दिले आहेत. ते कर्नाटकातल्या कोप्पल जिल्ह्यातील  एका सभेत बोलत होते.

अनंत कुमार हेगडे हे कौैशल्य विकास आणि रोजगार निर्मिती खात्याचे केंद्रीय राज्य मंत्री आहेत.  स्वत:ला धर्मनिरपेक्ष  म्हणवणाऱ्या लोकांना  त्यांचं रक्त काय हेच कळलेलं नाही. घटनेत धर्मनिरपेक्ष शब्द आहे म्हणून तुम्ही स्वत:ला धर्मनिरपेक्ष शब्द म्हणू शकता पण संविधानात बदलही करता येतात.   आणि त्यासाठीच आम्ही निवडून  आलो आहोत असंही ते म्हणाले आहेत.

याआधीही हेगडे यांनी अनेक वादग्रस्त विधानं केलेली आहेत. टिपू सुलतानबद्दल अनेक आक्षेपार्ह  विधानं केली आहेत. पुढच्या वर्षी कर्नाटकमध्ये निवडणुका आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने जोरदार प्रचारास सुरूवात केली आहे.  त्यामुळे आता संविधानातून धर्मनिरपेक्ष हा  शब्द काढणार की नाही हे पाहणं महत्त्वाचं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 26, 2017 01:08 PM IST

ताज्या बातम्या