बहराइच (उत्तर प्रदेश), 24 मार्च: एका प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापकानं विष पिऊन आत्महत्या (Principal commits suicide) केल्याची घटना समोर आली आहे. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाइट नोटमधून यामागचं धक्कादायक कारण उघड झालं आहे. मृत मुख्याध्यापकानं आपल्या शाळेतील तीन शिक्षक आणि एका शिक्षिकेच्या पतीविरोधात गंभीर आरोप लावले आहेत. हे चारही जण आपल्या पत्नीवर वाकडी नजर ठेवून होते. त्यांना विरोध केला असता, 'तुझ्या डोळ्यादेखत पत्नीवर बलात्कार करण्याची धमकी देत होते', असा खळबळजनक आरोप या सुसाइड नोटमध्ये केला आहे.
ही घटना उत्तर प्रदेशातल्या बहराइच जिल्ह्यात घडली. या चार शिक्षकांच्या त्रासाला कंटाळून एका मुख्याध्यापकानं मंगळवारी विष प्राशन केलं. यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण बुधवारी रुग्णालयात उपचार सुरू असताना, त्यांचा मृत्यू झाला आहे. मृत मुख्याध्यापकाच्या पत्नीच्या तक्रारीनंतर संबंधित चार लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यानंतर पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून पुढील कार्यवाही केली जात आहे. मानसिक आणि सामाजिक शोषण झाल्यामुळे आपण आत्महत्या करत असल्याचं त्यांनी आपल्या सुसाइड नोटमध्ये लिहिलं आहे. विशेष म्हणजे चारही आरोपी विशिष्ट समुदायातील आहेत.
बापरे! आकर्षक व्यक्ती दिसताच तिला येतो अटॅक; जमिनीवरच कोसळते तरुणी
संबंधित मृत मुख्याध्यापकाचं नाव नीरज कुमार चौबे असून ते ब्लॉक जरवलच्या प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक म्हणून काम करत होते. ते उत्तर प्रदेशातील कैसरगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ऐनी रोडवरील जाफर इमारतीत आपल्या शिक्षिका पत्नीसोबत राहत होते. याच इमारतीत राहणारे तीन शिक्षक आणि एका शिक्षिकेच्या पतीविरोधात त्यांनी गंभीर आरोप केले आहेत. हे चार आरोपी आपल्या पत्नीवर वाकडी नजर ठेवून होते, सोबतच अश्लील शब्दांत कमेंटही करत होते. असे आरोप लावून त्यांनी आपल्या शाळेत असताना 200 ग्रॅम सल्फाशच्या गोळ्या खाल्या आहेत.
हे ही वाचा-संतापजनक! फ्लॅटवर मित्राला बोलावणं बेतलं जीवावर; घरमालकाने केली हत्या
यानंतर त्यांची अचानक प्रकृती बिघडली. त्यामुळे शाळेतील इतर शिक्षकांनी त्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल केलं. त्यानंतर त्यांची प्रकृती आणखीच बिघडल्यानंतर त्यांना लखनऊ येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण बुधवारी रुग्णालयात उपचार घेत असताना त्यांच्या प्राणज्योत मालवली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास केला जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Husband suicide, Uttar pardesh