VIDEO: ...तोपर्यंत मोदींना सुखाने झोपू देणार नाही : राहुल गांधी

VIDEO: ...तोपर्यंत मोदींना सुखाने झोपू देणार नाही : राहुल गांधी

'मोदी शेतकऱ्यांचा वापर करुन घेत आहेत. कर्जमाफीचं आमचं वचन आम्ही पूर्ण केलं आहे. आम्ही कर्जमाफी करण्यासाठी पंतप्रधानांवर दबाव आणू,' असं राहुल गांधी म्हणाले.

  • Share this:

नवी दिल्ली, 18 डिसेंबर : 'देशातील शेतकऱ्यांची कर्जमाफी होईपर्यंत नरेंद्र मोदींना सुखाने झोपू देणार नाही,' असं म्हणत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सरकारला इशारा दिला आहे. मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेस सरकार स्थापन झाल्यानंतर लगेचच कर्जमाफी करण्यात आली. या पार्श्वभूमीवर राहुल गांधी पत्रकारांशी संवाद साधत होते.

'मोदी शेतकऱ्यांचा वापर करुन घेत आहेत. कर्जमाफीचं आमचं वचन आम्ही पूर्ण केलं आहे. आम्ही कर्जमाफी करण्यासाठी पंतप्रधानांवर दबाव आणू,' असं राहुल गांधी म्हणाले.राहुल गांधींनी मांडलेले ठळक मुद्दे:

- कॉंग्रेसचा विजय हा सामान्य माणसाचा विजय

- हा देश शेतकऱ्यांचा

- मोदींनी गेल्या चार वर्षात एक रुपयाचंही शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं नाही

- आम्ही शेतकऱ्यांसाठी काम करत आहोत

- आमचा विजय हा तरुणांचा , छोट्या दुकानदारांचा आणि शेतकऱ्यांचा विजय आहे

- आम्ही पंतप्रधानांना देशासाठी काम करण्यासाठी भाग पाडू


VIDEO : मोदी नको भाजपचं आता नेतृत्व गडकरींकडे द्या, सरसंघचालकांना पत्र


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 18, 2018 01:15 PM IST

ताज्या बातम्या