Home /News /national /

'महाराष्ट्रात पाय ठेवू देणार नाही', नवनीत राणांना 11 वेळा फोन करून जीवे मारण्याची धमकी

'महाराष्ट्रात पाय ठेवू देणार नाही', नवनीत राणांना 11 वेळा फोन करून जीवे मारण्याची धमकी

 फोनवर बोलणाऱ्या व्यक्तीने अर्वाच्च भाषा वापरून नवनीत राणा यांना धमकी दिली. 'महाराष्ट्रात येऊ देणार नाही,आलात तर जीवानिशी मारू.

नवी दिल्ली, 25 मे :  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घरासमोर हनुमान चालीसा म्हणण्याच्या प्रकरणामुळे चर्चेत आलेल्या अमरावतीच्या खासदार नवनीत राणा ( mp Navneet Rana) यांना आता धमकीचे फोन (threatened call) येत असल्याची माहिती समोर आली आहे. नवनीत राणा यांना 'महाराष्ट्रात येऊ देणार नाही,आलात तर जीवानिशी मारू' अशी धमकी देत अनोळखी नंबरवरून 11 वेळा धमकीचे फोन आल्याची माहितीसमोर आली. खासदार नवनीत राणा सध्या नवी दिल्लीत आहे. राणा यांना गेल्या काही दिवसांपासून अनोळखी नंबरवरून 11  वेळा फोन आले. फोनवर बोलणाऱ्या व्यक्तीने अर्वाच्च भाषा वापरून नवनीत राणा यांना धमकी दिली. 'महाराष्ट्रात येऊ देणार नाही,आलात तर जीवानिशी मारू. पुन्हा हनुमान चालीसा वाचली तर जीवानिशी संपविण्याची धमकीच फोनवरून देण्यात आली. या प्रकरणी नवनीत राणा यांनी नॉर्थ एव्हेण्यू दिल्ली पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी फोन कुठून आला आणि कुणी केला याचा तपास करत आहे. (साखरेच्या निर्यांत बंदीवर राजू शेट्टीची मोदी सरकारवर खरमरीत टीका) दरम्यान, दुसरीकडे आमदार रवी राणा आणि  एका अनोळखी व्यक्तीचा कॉल रेकॉर्ड व्हायरल झाला आहे. एका अनोळखी व्यक्तीने आमदार रवी राणा यांना कॉल करून आमच्यासोबत पाच लाख लोक जोडलेले आहे, तुम्ही  त्यांना हनुमान चालीसा ऐकावी, असं सांगितलं. त्यावर आमदार रवी राणा यांनी स्वतः रवी राणांकडे कडेच कॉल देतो असे सांगून वेळ मारून नेली, या संदर्भातील ऑडिओ मोठ्या प्रमाणात राज्यभर व्हायरल होत आहे. काय आहे फोनमध्ये संवाद? अनोळखी  व्यक्ति:-हॅलो,  रवी राणा सहाब आप ही बोल रहे क्या? रवी राणा:-हा  मैं ही बोल रहा हु... अनोळखी व्यक्ति:-एक पुण्य का काम करो..हमारे साथ पांच लाख लोक जुड़ चुके है. आप हनुमान चालीसा सुनाव रवि राणा:- मैं रवी राणा के पास फोन देता हूं.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या