मराठी बातम्या /बातम्या /देश /

कोरोनाग्रस्त रुग्णांची सोशल मीडियावर निंदा-नालस्ती, कुटुंबाने ठरवलं देश सोडणार

कोरोनाग्रस्त रुग्णांची सोशल मीडियावर निंदा-नालस्ती, कुटुंबाने ठरवलं देश सोडणार

आधीच कोरोनाशी संघर्ष करणारं ते दाम्पत्य समाजाच्या टीकेमुळे अधिक त्रस्त झालं आहे.

आधीच कोरोनाशी संघर्ष करणारं ते दाम्पत्य समाजाच्या टीकेमुळे अधिक त्रस्त झालं आहे.

आधीच कोरोनाशी संघर्ष करणारं ते दाम्पत्य समाजाच्या टीकेमुळे अधिक त्रस्त झालं आहे.

    कोट्यायम, 16 मार्च : देशभरात कोरोनाचा (Coronvirus) विळखा वाढत आहे. आतापर्यंत भारतात (India) 107 कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. या रुग्णांवर आयसोलेशन वॉर्डमध्ये उपचार सुरू आहे. आधीच कोरोनाच्या संकटाशी सामना देणाऱ्या एका दाम्पत्याल सोशल मीडियावरील (Social Media) टीकाही सहन करावी लागत आहे. कोरोनाग्रस्त रुग्णांची नावं जाहीर करण्यास प्रतिबंध असतानाही अनेकांनी सोशल मीडियावर रुग्णांनी नावे जाहीर केल्याची घटना कोट्यायम येथे घडली आहे. येथील Covid – 19 चा रुग्ण मेडिकल कॉलेज हॉस्पिटल येथे दाखल आहे. सोशल मीडियावर त्यांच्या व कुटुंबीयांविरोधात केल्या जाणाऱ्या टीकेमुळे त्रस्त असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. एकदा माझी तब्येत सुधारल्यानंतर मी भारतात राहणार नाही, मी परदेशात निघून जाईन, असे ते म्हणाले. टाईम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्रात हे वृत्त आले आहे. पती व पत्नी व एक लहान मुलगी असं त्यांचं कुटुंब आहे. यापैकी पती – पत्नीला कोरोनाची लागण झाली आहे. संबंधित - सावधान ! नोटांवरही असू शकतो ‘कोरोना’; कॅश नव्हे डिजिटल पेमेंट करा, RBI चा सल्ला इटलीहून आल्यानंतर वैद्यकीय तपासणी करण्यापूर्वीच लोकांची भेट घेतली म्हणून या दाम्पत्याविरोधात सोशल मीडियावरुन टीका केली जात आहे. दरम्यान भारतात याचा संसर्ग वाढू नये यासाठी भारताच्या सीमा सील करण्यात आल्या आहेत पाक सीमाही सील केली जाईल दरम्यान, परदेशातून कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्र सरकारने पाच शेजारील देशांच्या सीमा सील करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशानुसार, भारत-नेपाळ (India - Nepal), भारत-बांगलादेश (India - Bangladesh), भारत-भूतान (India - Bhutan), भारत-म्यानमार (India - Myanmar) सीमारेषा सील करण्यात आल्या आहेत. 14 मार्च रोजी 12 वाजता ही कारवाई करण्यात आली आहे. 15 मार्चच्या रात्री 12 वाजल्यापासून पाकिस्तानच्या सीमाही सील करण्यात येणार आहे. आता या हद्दीतून प्रवाशांच्या प्रवेशावर बंदी आहे. आहे. संबंधित - कोरोना व्हायरसची दहशत पसरवल्याप्रकरणी चीनच्या अध्यक्षांविरोधात कोर्टात तक्रार
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Corona virus in india

    पुढील बातम्या