CAA PROTEST : 'हिंसाचार थांबवा त्यानंतरच सुनावणी करू', सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांना फटकारले

CAA PROTEST : 'हिंसाचार थांबवा त्यानंतरच सुनावणी करू', सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांना फटकारले

CAA विरोधात आंदोलनादरम्यान जामियात हिंसाचार झाला याप्रकरणी तात्काळ सुनावणी कऱण्यात यावी अशी मागणी करणारी याचिका दाखल करण्यात आली होती.

  • Share this:

नवी दिल्ली, 16 डिसेंबर : जामिया आणि अलीगढ मुस्लिम विद्यापीठात सुरू असलेल्या आंदोलनाबाबत सर्वोच्च न्यायायलयात तात्काळ सुनावणीची मागणी करण्यात आली होती. वकील इंदिला जयसिंग यांनी देशात मानवाधिकाराचे उल्लंघन होत असल्याचं म्हणत सर्वोच्च न्यायालयात तात्काळ सुनावणीची मागणी केली होती. यावर सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी सुनावणी करू असं म्हटलं पण आधी हिंसाचार थांबवण्याचे आदेश दिले आहेत. सरन्यायाधीशांनी म्हटले की, शांततेनं विरोध करणाऱ्यांविरुद्ध आम्ही नाही आणि अधिकारांच्या संरक्षणासाठी आमची जबाबदारी माहिती आहे.

सरन्यायाधीशांच्या पीठाने याचिकाकर्त्याने पोलिसांकडून झालेल्या हिंसाचाराचा व्हिडिओही असल्याचं म्हटलं. यावर सरन्यायाधीशांनी याचिकाकर्त्याला फटकारत हे न्यायालय आहे या ठिकाणी तुमचं म्हणणं शांतपणे मांडावं लागेल. या प्रकरणावर मंगळवारी सुनावणी होईल पण त्याआधी हिंसाचार थांबला पाहिजे असं म्हटलं.

हिंसाचाराच्या घटनांवर नाराजी व्यक्त करत सरन्यायाधीश म्हणाले की, तुमच्याकडे यावर काही मार्ग आहे म्हणून तुम्हा आला असाल तर शांतपणे तुमचं म्हणणं मांडायला हवं. जर आंदोलक म्हणून तुम्ही राहणार असाल तर तेच करा. आम्ही अधिकारांचे संरक्षण करण्यास वचनबद्ध आहे. पण हे गोंधळाच्या वातावरणात होऊ शकतं नाही. पहिल्यांदा हे सर्व थांबवा त्यानंतर आम्ही स्वत: याबाबत पाऊले उचलू असं मत सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केलं.

दिल्ली पोलिसांकडून हिसांचार केला गेल्याच्या म्हणण्यावर हा कायदा आणि सुव्यवस्थेचा मुद्दा आहे. अशा परिस्थितीत पोलिसांना काही भूमिका घ्यावी लागते. आम्ही शांततेच्या विरोधात नाही. सार्वजनिक संपत्तीचे नुकसान करता येणार नाही. आंदोलनासाठी विद्यार्थ्यांना कायदा हातात घेता येणार नाही असंही सरन्यायाधीशांनी बजावले.

याप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयातही तात्काळ सुनावणी व्हावी अशी मागणी करणारी जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने जामिया हिंसाचार आणि 52 विद्यार्थ्यांना ताब्यात घेतल्याच्या प्रकरणावर तात्काळ सुनावणीस नकार दिला. न्यायालयाने म्हटलं की, याचिकाकर्त्याने आधी रजिस्ट्री करून त्यानंतरची आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून इथं या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 16, 2019 11:50 AM IST

ताज्या बातम्या