रामजन्मभूमीवर फक्त राम मंदिरच होणार-मोहन भागवत

4 डिसेंबरला सुप्रीम कोर्टात रामजन्मभूमी खटल्यावर अंतिम सुनावणी होणार आहे. तत्पूर्वी रामजन्मभूमी खटल्यातील सर्व पक्षांनी मध्यस्थी करावी असा निकाल सुप्रीम कोर्टाने काही दिवसांपूर्वी दिला होता.त्यानंतर रामजन्मभूमी खटल्यातील पक्षांमध्ये याविषयी चर्चाही झाली होती

Chittatosh Khandekar | News18 Lokmat | Updated On: Nov 24, 2017 05:31 PM IST

रामजन्मभूमीवर फक्त राम मंदिरच होणार-मोहन भागवत

उडुपी, 24 नोव्हेंबर: रामजन्मभूमीवर फक्त राम मंदिरच होणार असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले. ते उडुपीच्या  धर्मसंसदेत बोलत होते.

4 डिसेंबरला सुप्रीम कोर्टात रामजन्मभुमी खटल्यावर अंतिम सुनावणी होणार आहे. तत्पूर्वी रामजन्मभूमी खटल्यातील सर्व पक्षांनी मध्यस्थी करावी असा निकाल सुप्रीम कोर्टाने काही दिवसांपूर्वी दिला होता.

त्यानंतर रामजन्मभूमी खटल्यातील पक्षांमध्ये याविषयी चर्चाही झाली होती. काही दिवसांपूर्वी शिया वक्फ बोर्डाने अयोध्येत राम मंदिर बांधा तर त्या बदल्यात आम्हाला एक मशीद लखनऊमध्ये बांधून द्या असं वक्तव्य केलं होतं. आता या सगळ्या पार्श्वभूमीवर धर्मसंसदेत आज भागवतांनी असं वक्तव्य केलं आहे.

त्यामुळे आता रामजन्मभूमीचा मुद्दा चिघळतो की वादग्रस्त जमिनीवर राम मंदिर उभं राहतं याबद्दल संभ्रम आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही राम मंदिर बांधण्यास कटीबद्ध असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

त्यामुळे आता राम मंदिर खरंच बांधलं जातं की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 24, 2017 04:30 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...