भारतीय विमान पाडल्याबाबत पाक परराष्ट्रमंत्र्यांनी पुन्हा केला 'हा' दावा

भारतीय विमान पाडल्याबाबत पाक परराष्ट्रमंत्र्यांनी पुन्हा केला 'हा' दावा

शाह मेहमुद कुरेशी यांनी आम्बी भारताचा दोन विमानं पाडल्याचा दावा पाकिस्तानी संसदेमध्ये केला आहे.

  • Share this:

इस्लामाबाद, 7 मार्च : खोटं बोलण्यामध्ये पाकिस्तान कोणतीही कमी सोडताना दिसत नाही. 'पाकिस्ताननं भारताची दोन विमानं पाडली' असा दावा पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह मेहमुद कुरेशी यांनी बुधवारी(6 मार्च) संसदेमध्ये दिली आहे. यावेळी त्यांनी नोमान अली खान या पायलटची स्तुतीदेखील केली. भारताच्या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानी विमानं भारताच्या हद्दीत घुसली होती. त्यावेळी भारतानं पाकिस्तानचं एफ-16 हे विमान पाडलं होतं. तर, मिग -21 क्रॅश झाल्यानंतर विंग कमांडर अभिनंदन वर्तमान यांना पाकिस्ताननं ताब्यात घेऊन तब्बल 60 तासांनंतर त्यांची सुटका केली होती. यापूर्वी देखील पाकिस्ताननं भारताची दोन विमानं पाडल्याचा दावा केला होता. पण, भारतानं मात्र पाकिस्तानचा दावा फेटाळून लावला होता.

दरम्यान, विंग कमांडर अभिनंदन यांना सोडण्याच्या निर्णयावर आता बेनझीर भुट्टो यांचा मुलगा आणि पाकिस्तान पीपल्स पार्टीचे अध्यक्ष बिलावल भुट्टो यांनी टीका केली आहे. विंग कमांडर अभिनंदन यांना सोडण्यामध्ये पाकिस्ताननं घाई केली असून धोका पत्कारल्याचं बिलावल भुट्टो यांनी म्हटलं आहे.

पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यामध्ये सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले होते. त्यानंतर भारत - पाकिस्तानमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. शिवाय, दहशतवाद्यांविरोधात देखील भारतानं आता कठोर पावलं उचलायला सुरूवात केली आहे.

मसूद अझहरची ऑडिओ क्लिप जारी, काय म्हणाला ते वाचा

मुशर्रफ यांनी धक्कादायक कबुली

दहशतवादाला आम्ही पोसत नाही असा दावा करणारा पाकिस्तान पुन्हा एकदा जगासमोर उघडा पडला आहे. पाकिस्तानचे माजी लष्करप्रमुख आणि माजी राष्ट्राध्यक्ष परवेज मुशर्रफ यांनी त्याबाबतची धक्कादायक अशी कबुली दिली आहे. 'माझ्या काळात पाकिस्ताननं भारताविरोधात 'जैश ए मोहम्मद'चा वापर केल्याची कबुली मुशर्रफ यांनी पाकिस्तानचे पत्रकार नदीम मलिक यांना दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले आहे. बुधवारी पाकिस्तानातील 'हम न्यूज' या वृत्तवाहिनीशी मुशर्रफ बोलत होते. शिवाय, पाकिस्ताननं 'जैश ए मोहम्मद' विरोधात केलेल्या कारवाईचं देखील मुशर्रफ यांनी स्वागत केलं आहे. यावेळी बोलताना परवेज मुशर्रफ यांनी जैशनं डिसेंबर 2003मध्ये दोन वेळा माझ्या हत्येचा प्रयत्न केल्याची देखील माहिती दिली.

मसूद अझहरची ऑडिओ क्लिप जारी

'जैश-ए-मोहम्मद'चा म्होरक्या मसूद अझहरची ऑडिओ क्लिप समोर आली आहे. यामुळे गेल्या काही दिवसांपासून त्याच्या मृत्युसंदर्भात सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. बुधवारी (6मार्च) संध्याकाळच्या सुमारास 'जैश-ए-मोहम्मद'कडूनच मसूदची 10 मिनिटांची ऑडिओ क्लिप जारी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. ऑडिओ क्लिपमध्ये अझहरने भारतीय कारागृहात असताना त्याच्यावर करण्यात आलेल्या कथित अत्याचारांची माहिती देण्याची बाष्फळ बडबड केली आहे. तसंच सध्या पाकिस्तान दबावाखाली काम करत आहे, असा कांगावादेखील त्यानं केला आहे.

भाजप खासदार आणि आमदार यांच्यातील तुफान हाणामारीचा VIDEO

First published: March 7, 2019, 9:02 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading