जयललितांच्या तब्येतीबद्दल आम्ही खोटं बोललो-वनमंत्री श्नीनिवासन यांचं स्पष्टीकरण

जयललितांच्या तब्येतीबद्दल आम्ही खोटं बोललो-वनमंत्री श्नीनिवासन यांचं स्पष्टीकरण

डिंडिगल यांच्या माहितीनुसार जयललितांना आजारी असताना कुणीही भेटलं नाही. राज्यपालांनाही पहिल्या मजल्यापर्यंतच जाऊ दिलं गेलं

  • Share this:

24 सप्टेंबर: तमिळनाडूच्या माजी दिवंगत मुख्यमंत्री जे जयललिता आजारी असताना आम्ही त्यांच्या तब्येतीलबद्दल जनतेशी खोटं बोललो असा सनसानटी गौप्यस्फोट तामिळनाडूचे वनमंत्री डिंडीगल श्रीनिवासन यांनी केला आहे. जयललिता यांना चेन्नईच्या अपोलो रूग्णालयात गेल्या वर्षी 22सप्टेंबरला दाखल करण्यात आलं होतं. 5 डिसेंबरला त्यांचा मृत्यू झाला होता.

डिंडिगल यांच्या माहितीनुसार जयललितांना  आजारी  असताना  कुणीही भेटलं नाही. राज्यपालांनाही पहिल्या मजल्यापर्यंतच जाऊ दिलं गेलं. आजारी असताना जयललितांना अनेक लोक भेटत होते तसंच त्या इडलीचा नाश्ताही लोकांसोबत करत होत्या असं तेव्हा सांगण्यात आलं होतं. पक्षाच्या हितासाठी गुपितं उघड होऊ नये म्हणून खोटं बोलत असल्याचं डिंडिगल यांनी सांगितलं. फक्त शशिकला आणि त्यांचे कुटुंबियच अम्मांच्या शेजारी होते, त्यांना भेटत होते आणि अम्मांना मारण्यात त्यांचाच हात आहे, असा आरोप या  श्रीनिवासन यांनी  केला आहे.

First published: September 24, 2017, 10:18 AM IST

ताज्या बातम्या