Home /News /national /

कंत्राटी शेतीशी आमचा संबंध नाही; शेतीची जमीन खरेदी करणार नाही- रिलायन्स

कंत्राटी शेतीशी आमचा संबंध नाही; शेतीची जमीन खरेदी करणार नाही- रिलायन्स

रिलायन्सनं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे की कमी किमतीत शेतमाल खरेदी करण्याचा कोणताही दीर्घकालीन करार कंपनीने कधीही केला नाही.

    मुंबई, 4 जानेवारी: केंद्र सरकारच्या कृषी सुधारणा कायद्याच्या विरोधात सध्या शेतकऱ्यांचं दिल्लीसह उत्तर भारतामध्ये आंदोलन सुरू आहे. या आंदोलनादरम्यान रिलायन्स रिटेलनं आपली भूमिका स्पष्ट केली आहे. कॉर्पोरेट शेती किंवा कंत्राटी शेतीशी आमचा काही संबंध नाही. कॉर्पोरेट किंवा कॉन्ट्रॅक्ट शेतीत हस्तक्षेप करण्याबाबत आमचा कोणताही विचार नसल्याचं म्हणत आपली भूमिका रिलायन्सने स्पष्ट केली आहे. कंपनीने याबाबत एक निवेदन जारी केलं आहे. या निवदेनात कंपनीने असेही म्हटले आहे की ती शेतीची जमीन खरेदी करणार नाही. रिलायन्सने सोमवारी एक निवेदन जारी करून हे स्पष्ट केले आहे की ते शेतकर्‍यांकडून थेट धान्य खरेदी करत नाही. पुरवठादार किंवा MSPच्या दराने ते शेतकऱ्यांकडून धान्य खरेदी करतात किंवा असे पुरवठादार जे शेतकऱ्यांकडून MSP ने धान्य खरेदी करतात अशाच पुरवठादारांकडून कंपनी धान्य खरेदी करते. कंपनीने म्हटले आहे की कमी किंमतीत दीर्घकालीन खरेदी कराराचा कंपनीने कोणताही करार शेतकऱ्यांसोबत केलेला नाही. -कॉन्ट्रॅक्ट फार्निंगचं रिलायन्ससोबत कोणतंही देणं घेणं नाही. s-कोणत्याही कॉर्पोरेट फार्मिंगसाठी कंपनीने जमीन घेतली नाही. -शेतीसाठी कधीही जमीन खरेदी करणार नाही. -RIL शेतकऱ्यांकडून थेट धान्य अथवा शेतमाल खरेदी करत नाही. पंजाबमध्ये ‘रिलायन्स जिओ’ च्या विरोधात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या प्रकरणात रिलायन्स कंपनीनं आपली बाजू मांडली आहे. “आमचा कॉर्पोरेट किंवा कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगशी काहीही संबंध नाही. त्या क्षेत्रात दाखल घेण्याची देखील आमची योजना नाही. आम्ही कधीही कॉर्पोरेट फार्मिंगसाठी शेत जमीन खरेदी केली नाही, तसंच भविष्यातही खरेदी करणार नाही.’ असं स्पष्टीकरण कंपनीनं दिलं आहे. रिलायन्स कंपनीनं जिओ टॉवर्सच्या तोडफडीच्या विरोधात पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. आमच्या कर्मचाऱ्यांचं तसंच संपत्तीचं संरक्षण करण्यात यावं अशी विनंती या याचिकेत करण्यात आली आहे. या तोडफीडीमध्ये व्यावसायिक प्रतिस्पर्धी मंडळींचा हात आहे, असंही कंपनीनं आपल्या निवेदनात म्हटलं आहे. (सूचना- न्यूज 18 लोकमत ही रिलायन्स इंडस्ट्रीजची कंपनी नेटवर्क 18 मीडिया अॅण्ड इन्वेस्टमेंट लिमिटेडची भागीदार आहे. नेटवर्क18 मीडिया अॅण्ड इन्वेस्टमेंट लिमिटेडचे सर्व हक्क रिलायन्स इंडस्ट्रीजजवळ आहेत.)
    First published:

    Tags: Breaking News, Reliance

    पुढील बातम्या