पणजी, 17 मार्च : गोव्याचे मुख्यमंत्री गेल्या वर्षभरापासून अन्नाशयाच्या कर्करोगाशी झुंज देत आहेत. त्यांची प्रकृती ठीक व्हावी अशी प्रार्थना आम्ही करत आहोत मात्र त्यांची वाचण्याची शक्यता कमी असल्याचे गोव्याचे भाजप आमदार आणि विधानसभेचे उपाध्यक्ष मायकल लोबो यांनी म्हटले आहे.
राज्यात काँग्रेसने सत्तास्थापनेचा दावा केला आहे. तर सत्ताबदलाबाबत बोलताना मायकल लोबो म्हणाले की, गोव्याच्या नेतृत्वात बदल होणार नाही. जोपर्यंत पर्रिकर आहेत तोपर्यंत तेच मुख्यमंत्री राहतील. त्यांची जागा घेण्याचा दावा कोणीही करणार नाही. आम्ही त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करत आहे. पण त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्याची शक्यता नसल्याचे मायकल लोबो यांनी सांगितले. पर्रिकरांचे काही बरे वाईट झाल्यास भाजपचा पुढचा मुख्यमंत्री होईल असे मायकल लोबो म्हणाले.
BJP MLA & Deputy Speaker of Goa Assembly, Michael Lobo: Emergency meeting was held as Parrikar Ji got really ill last night. Doctors are seeing him & not saying that he'll recover. By-polls are also near in 3 constituencies & the meeting was also to finalise the candidature pic.twitter.com/rBpKZ0bIOj
— ANI (@ANI) March 16, 2019
पर्रिकरांची प्रकृती खालावल्याने तात्काळ बैठक बोलावण्यात आली होती. त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. ते लवकर बरे होतील अशी आशा वाटते. सध्या तीन मतदारसंघातील पोटनिवडणुका होणार असल्याने त्यासाठी बैठक झाली असे मायकल लोबो यांनी सांगितले.
सत्ता स्थापनेसाठी काँग्रेसची हालचाल
गोव्यात काँग्रेसने सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. काँग्रेसने राज्यपाल मृदुला सिन्हा यांना पत्र लिहले आहे. राज्यातील भाजपच्या नेतृत्वाखालील सरकार बरखास्त करण्याची मागणी काँग्रेसने केली आहे. काँग्रेसने असा दावा केला आहे की भाजपकडे पुरेसे संख्याबळ नाही. राज्यात सर्वाधिक आमदार काँग्रेस सोबत असल्याचे देखील त्यांनी पत्रात म्हटले आहे.
राज्यातील सर्वात मोठा पक्ष म्हणून काँग्रेसला सत्ता स्थापनेची संधी दिली पाहिजे. राज्यात राष्ट्रपतीशासन आणता येणार नाही. तर तसे प्रयत्न झाले तर त्याला आव्हान दिले जाऊ शकते असे देखील काँग्रेसचे म्हणणे आहे. 2017च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने सर्वाधिक 17 जागांवर तर भाजपने 13 जागांवर विजय मिळवला होता. पण अन्य पक्षांना सोबत घेऊन भाजपने सत्ता मिळवली होती.
गोव्याचे मुख्यमंत्री पर्रीकर यांची प्रकृती स्थिर, अफवांवर विश्वास ठेवू नका
गोव्याचे मुख्यमंत्री आणि माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांच्यावर सध्या उपचार सुरू असून पर्रिकरांच्या प्रकृतीबद्दल अनेक अफवा पसरत आहेत. याबाबत आता गोव्याच्या मुख्यमंत्री कार्यालयाने माध्यमांतून प्रसिद्ध झालेल्या काही बातम्या फेटाळून लावत मुख्यमंत्र्यांची प्रकृती स्थिर असल्याचे म्हटले आहे.
सत्ताधारी पक्षाने वारंवार मुख्यमंत्री पर्रिकरांच्या प्रकृतीबद्दलच्या अफवांचे खंडण केले आहे. त्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातात. गेल्या काही दिवसांत पर्रिकर सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी झाले होते.
गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये पर्रिकरांना कर्करोग झाल्याचे निदान झाले होते. तेव्हापासून ते दिल्लीच्या एम्स, न्यूयॉर्क, मुंबई आणि गोव्याच्या रुग्णालयात उपचार घेत आहेत.दरम्यान, एम्समध्ये भरती होण्यापूर्वी पर्रिकर यांनी गोवा विधानसभेच्या सत्रात सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी 2019-20चा अर्थसंकल्प सादर केला होता.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा