राजकीय वादानंतर Facebookने केला खुलासा, दिलं आरोपांना हे उत्तर!

राजकीय वादानंतर Facebookने केला खुलासा, दिलं आरोपांना हे उत्तर!

फेसबुक भाजपच्या नेत्यांच्या विखारी लिखाणावर डोळेझाक करत असल्याचं अमेरिकेच्या वॉल ट्रिट जनरलने म्हटलं होतं. त्यानंतर देशात राजकीय वादळ निर्माण झालं.

  • Share this:

नवी दिल्ली 21 ऑगस्ट: राजकीय आरोप-प्रत्यारोप होत असतांनाच Facebookने आपल्यावर होत असलेल्या आरोपांना उत्तर दिलं आहे. फेसबुक इंडियाच्या वतीने सर्व आरोपांना उत्तर देणारा खुलासा करण्यात आला आहे. फेसबुकचं धोरण हे स्वतंत्र असून आम्ही कुठल्याच विचारांचं समर्थन करत नाही. हिंसाचार आणि व्देष परसरविणाऱ्या विचारांना आम्ही खपवून घेत नाही. सर्व जगात आमचं धोरण सारखच असल्याचं फेसबुक इंडियाचे उपाध्यक्ष अजित मोहन यांनी म्हटलं आहे.

सर्वच प्रकारांच्या लिखाणासाठी फेसबुकचं धोरण सारखच असतं, जागतिक धोरणानुसारच कामकाज चालतं, आमची कुठल्याही राजकीय पक्षांशी, विचारधारेशी, जवळीक नाही.

फेसबुक भाजपच्या नेत्यांच्या विखारी लिखाणावर डोळेझाक करत असल्याचं अमेरिकेच्या वॉल ट्रिट जनरलने म्हटलं होतं. त्यानंतर देशात राजकीय वादळ निर्माण झालं. त्यानंतर काँग्रेसने फेसबुकला खरमरीत पत्र पाठवून खुलासा मागितला होता. त्यानंतर फेसबुकने हा खुलासा केला आहे.

वॉलस्ट्रिटने आंध्र प्रदेशातल्या भाजप आमदाराच्या भाषणाचा हवाला देत काही गोष्टी मांडल्या होत्या. त्याचप्रमाणे फेसबुक हे कसं भाजप नेत्यांच्या भाषणांकडे डोळेझाक करत असं दाखवून दिलं होतं. त्यानंतर या आरोपांना सुरुवात झाली होती. फेसबुकवर या आधीही अमेरिकेसह अनेक देशांमध्ये आरोप झाले होते.

जगातले कोट्यवधी लोक फेसबुकवर असल्याने आपलं मत त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी त्याचा फायदा होत असते.

Published by: Ajay Kautikwar
First published: August 21, 2020, 11:34 PM IST
Tags:

ताज्या बातम्या