'आम्ही महात्मा गांधींची मुलं नाही', मनेका गांधींचं वादग्रस्त वक्तव्य

'आम्ही महात्मा गांधींची मुलं नाही', मनेका गांधींचं वादग्रस्त वक्तव्य

केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्री मनेका गांधींनी सुलतानपूरमध्ये केलेल्या वक्तव्यावरून त्यांच्यावर जोरदार टीका होते आहे. मुस्लिमांनी मला मतं दिली नाहीत तर त्यांना मी नोकऱ्या देणार नाही, असं मनेका गांधी म्हणाल्या आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 12 एप्रिल : केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्री मनेका गांधींनी सुलतानपूरमध्ये केलेल्या वक्तव्यावरून त्यांच्यावर जोरदार टीका होते आहे. मुस्लिमांनी मला मतं दिली नाहीत तर त्यांना मी नोकऱ्या देणार नाही, असं मनेका गांधी म्हणाल्या.

निवडणुकीमध्ये तुमचा पाठिंबा नसेल तर मीही तुम्हाला काही देणं लागत नाही, असं तर त्यांनी म्हटलंच. शिवाय तुमच्यासाठी हे सगळं करायला आम्ही काही महात्मा गांधींची मुलं नाहीत, असा शेराही त्यांनी मारला.

उत्तर प्रदेशातल्या सुलतानपूरमध्ये मनेका गांधी भाजपतर्फे निवडणूक लढवत आहेत. याच सुलतानपूरमध्ये तुराब खानी गावात मनेकांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलं. सुलतानपूरमधला हा भाग मुस्लीमबहुल आहे. इथल्या सभेमध्ये मनेकांनी मतदारांना असा दम भरला.

नोकऱ्यांसाठी मतांचा सौदा?

जर मुस्लिमांनी मला मतं दिली नाहीत तर माझ्या भावना दुखावल्या जातील. पुढे तुम्ही माझ्याकडे नोकऱ्या मागायला आल्यात तर मला काय त्याचं, असा माझा पवित्रा असेल, असं मनेका गांधी म्हणाल्या. शेवटी हा सौदा आहे, मतं दिली तरच नोकऱ्या मिळतील, असं सांगायलाही त्या विसरल्या नाहीत.

मनेकांचं हे तीन मिनिटांचं भाषण सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल झालं आहे. पिलीभीतमध्ये मी केलेलं काम बघा आणि मला मत द्या, असं आवाहन त्यांनी केलं. याच पिलीभीत मतदारसंघातून मनेका गांधींनी मागची लोकसभा निवडणूक लढवली होती.

यावेळी मात्र त्यांचा मुलगा वरुण गांधी हे पिलीभीतमधून निवडणूक लढवत आहेत तर वरुण गांधींच्या सुलतानपूर मतदारसंघात मनेकांना उमेदवारी देण्यात आली आहे.

मनेका गांधींचं हे वक्तव्य खळबळजनक आहे, असं म्हणत काँग्रेसने त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

=====================================================================================================================================================================

VIDEO: मनेका गांधी यांचं आक्षेपार्ह वक्तव्य; मुस्लिमांना उद्देशून म्हणाल्या, मतं द्या नाहीतर...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 12, 2019 05:09 PM IST

ताज्या बातम्या