‘आम्ही देशविरोधी नाही, तर भाजप विरोधी’ 370 कलमासाठी लढा उभारण्याची फारुख अब्दुल्लांची घोषणा

‘आम्ही देशविरोधी नाही, तर भाजप विरोधी’ 370 कलमासाठी लढा उभारण्याची फारुख अब्दुल्लांची घोषणा

'भाजपविरोधी असणं म्हणजे देशविरोधी नाही. काश्मीर आणि लडाखच्या जनतेला पुन्हा अधिकार मिळावेत यासाठी आम्ही लढणार आहोत. ही लढाई हक्कांसाठी आहे धार्मिक नाही.'

  • Share this:

श्रीनगर 24 ऑक्टोबर: जम्मू आणि काश्मीसाठी असलेलं 370वं कलम पुन्हा लागू करण्यासाठी लढा उरण्याची घोषणा काश्मीरच्या सर्वपक्षीय नेत्यांनी केली आहे. यासाठी ‘लोक आघाडी’ तयार करण्यात आली असून फारुख अब्दुल्ला हे या आघाडीचे अध्यक्ष आहेत तर मेहबुबा मुफ्ती यांना उपाध्यक्ष करण्यात आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून या नेत्यांच्या वक्तव्यांमुळे वाद निर्माण झाले होते. त्यावर सपष्टीकरण देताना फारुख अब्दुल्ला म्हणाले, आम्ही देशविरोधी नाही तर आम्ही भाजप विरोधी आहोत.

5 ऑगस्ट 2019रोजी केंद्र सरकारने ऐतिहासिक निर्णय घेत काश्मिरमधून 370वं कलम आणि 35(A)हा नियम हटवला होता. त्यानंतर राज्यातल्या सगळ्या महत्त्वाच्या नेत्यांना नजरकैदेत टाकण्यात आलं होतं. नंतर काही महिन्यांपासून त्यांची मुक्तता करण्यात आली आहे. आता जवळपास सर्वच नेते मुक्त झाले असून त्यांनी पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिली आहे.

चीनच्या मदतीने 370वं कलम लागू होऊ शकते असं वक्तव्य फारुख अब्दुल्ला यांनी केलं होतं. तर काश्मीरचा झेंडा पुन्हा बहाल केल्याशीवाय तिरंगा फडकविणार नाही असं वक्तव्य मेहबुबा मुफ्ती यांनी केलं होतं. त्यावरून त्यांच्यावर टीका झाली होती.

मोदी 22 तास काम करतात! 1 ते 4 झोपण्यावरुन पुणेकरांना चंद्रकांत पाटलांचा टोला

त्याच टीकेला उत्तर देताना फारुख म्हणाले, भाजपविरोधी असणं म्हणजे देशविरोधी नाही. काश्मीर आणि लडाखच्या जनतेला पुन्हा अधिकार मिळावेत यासाठी आम्ही लढणार आहोत. ही लढाई हक्कांसाठी आहे धार्मिक नाही.

काय म्हणाल्या होत्या मेहबुबा मुफ्ती

तब्बल 14 महिन्यांच्या अटकेनंतर सुटका झालेल्या जम्मू-कश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपी नेता महबूबा मुफ्ती (Mehbooba Mufti, PDP) यांनी केंद्र सरकारवर अनेक आरोप लावले आहेत. शुक्रवारी एका पत्रकार परिषदेदरम्यान त्या हातात जम्मू-कश्मीरचा झेंडा दाखवित म्हणाल्या, माझा झेंडा हा आहे. जेव्हा हा झेंडा परत मिळेल तेव्हा तिरंगाही फडकवणार. आमचा झेंडाच तिरंग्यासह आमचे संबंध प्रस्थापित करतो.

मुक्ताईनगरमध्ये भाजप कार्यालय उघडण्यासाठीही कार्यकर्ता मिळाला नाही!

माध्यमांशी बोलताना महबुबा मुक्ती पुढे म्हणाल्या, आपण आर्थिकदृष्ट्या बांग्लादेशाहून मागे पडलो आहोत. मग तो रोजगाराचा मुद्दा असो वा दुसरं काही..प्रत्येक ठिकाणी सरकार अपयशी ठरली आहे. या सरकारने असं काम केलंच नाही जे दाखवून ते मत घेऊ शकतील. हे लोक म्हणतात आता जम्मू-काश्मीरमध्ये जमीन खरेदी केली जाऊ शकते. त्यानंतर म्हणतात फ्री कोरोना लस वाटणार..आज पंतप्रधान मोदींना मतांसाठी अनुच्छेद 370 वर बोलण्याची गरज पडली आहे.

Published by: Ajay Kautikwar
First published: October 24, 2020, 6:24 PM IST

ताज्या बातम्या